Nanded | तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या, नांदेड पोलिसांची कामगिरी
स्थानिक पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी तेथून पसार झाला होता. अखेर त्याचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या झटापटीत पोलिसांना या आरोपीच्या पायावर गोळीबारही करावा लागला.
नांदेड: शहरात (Nanded city) वाढलेल्या गुंडगिरीविरोधात नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड पोलिसांकडूनही (police) खबरदारी घेतली जात आहे. नांदेड पोलिसांनी नुकतंच एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतलं. खुनाच्या गुन्ह्यात आरोपी असलेला हा सराईत गुन्हेदार दिलीप डाखोरे काही दिवासांपूर्वी जामीनावर बाहेर आला होता. जवाहर नगर येथे काही कारणास्तव त्याचे एका युवकाशी वाद जाले होते. याच भांडणातून त्याने युवकावर गोळीबार केला होता. स्थानिक पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी तेथून पसार झाला होता. अखेर त्याचा पाठलाग करत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या झटापटीत पोलिसांना या आरोपीच्या पायावर गोळीबारही (Firing) करावा लागला.
तलवारीने हल्ला करून पळू लागला..
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप डाखोरे हा गुन्हेगार काही दिवसांपूर्वी जामीनावर जेलबाहेर आला होता. जवाहर नगर येथे त्याचा एका युवकाशी वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात झाले. दिलीप डाखोरे याने एका युवकावर गोळीबारही केला. मात्र या युवकाला गोळी लागली नाही. तेव्हा दिलीपने युवकावर तलवारीने हल्ला केला आणी तो तेथून पसार झाला. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी तपास सुरु केला. तेव्हा दिलीप डाखोरे हा लोहा तालुक्यातील सुनेगाव परिसरातील एका ढाब्यावर असल्याची माहिती खबरींमार्फथ मिळाली. सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तेथे पोहोचले. तेथेही पोलिसांशी या गुंडाशी बाचाबाची झाली. या झटापटीत आरोपीने पोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांची बंदूक हिसकावून घेतील. तेव्हा पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी डाखोरे याच्या पायावर गोळी झाडून त्याला ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी यापूर्वीही एका कुख्यात आरोपीवर गोळी झाडून त्याला ताब्यात घेतले होते.