AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतात मजुरांची कमतरता, युवकाने तयार केला देशी जुगाड; सर्वत्र होत आहे कौतुक

फवारणी न झाल्याने शेतीचे नुकसान होत होते. उत्पन्नात घट होत होती. कमलेश चौधरी या युवकाने वेगवेगळे प्रयोग केले.

शेतात मजुरांची कमतरता, युवकाने तयार केला देशी जुगाड; सर्वत्र होत आहे कौतुक
| Edited By: | Updated on: Aug 06, 2023 | 6:54 PM
Share

नंदुरबार : ही स्टोरी आहे सुशिक्षित असलेल्या शेतकऱ्याची. बीएसस्सी अॅग्री केल्यानंतर त्याने घरची शेती करण्याचे ठरवले. शेतीत काम करण्यासाठी मजूर मिळेना. मजुरांअभावी अनेक समस्यांना त्याला समोरे जावे लागत होते. पिकांवर फवारणी करण्यासाठी अडचण येत होती. फवारणी न झाल्याने शेतीचे नुकसान होत होते. उत्पन्नात घट होत होती. कमलेश चौधरी या युवकाने वेगवेगळे प्रयोग केले. घरच्या वस्तूंचा वापर करून त्याने २७ फूट उंच रुंदीचा स्प्रे बूम मशीन फवारणी यंत्र विकसित केला. हे देशी जुगार दिवसाला ५० ते ६० एकर क्षेत्रावर फवारणी करू शकते. एक एकर जमिनीवर फवारणी करण्यासाठी साधारण १५ ते २० मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे वेळही वाचतो. कामही भराभर होतो.

असा केला देशी जुगाड

सोशल मीडियात येणाऱ्या असलेल्या माहितीच्या संकलन करत त्यांनी हा जुगाड तयार केला आहे. हे यंत्र बनवताना ट्रॅक्टरचे मोठे टायर काढून घेत कमलेश यांनी १८ एम एम आणि तेरा एम एम इंच जाड टायर वापरले. मागील बाजूस पंप बसवला आहे. ट्रॅक्टरच्या पुढील बाजूस २७ फूट रुंदीचे फवारणी यंत्र बसवून ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारणी करतात.

फवारणी यंत्राचा शेतकऱ्यांना फायदा

कमलेश चौधरी यांनी तयार केलेला उपकरणाचा फायदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना होणार आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना प्रमुख अडचण असलेल्या मजूर टंचाईवर यामुळे मात करता येण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या यंत्राचा फायदा परिसरातील अनेक शेतकरी घेत असल्याचं परिसरातील शेतकरी हरी दत्तू पाटील यांनी सांगितलं.

मजूर टंचाईच्या समस्येवर मात

वेळ आणि मजूर त्यांच्यावर शोधलेला हा पर्याय अनेक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. कमलेश चौधरी आपल्या या उपकरणात अजून काही बदल करणार आहेत. यातून ग्रामीण भागातील मुख्य मजूर टंचाईच्या समस्येवर मात करता येणार आहे.

मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी कमलेश यांनी हा उपाय शोधून काढला. ट्रॅक्टरवर चालणारं फवारणी यंत्र तयार केलं. या मशीनच्या मदतीने रोज पन्नास ते साठ एकर जागेवर फवारणी करता येते. यामुळे मजूर टंचाईसारखा मोठा प्रश्न निकाली लागला आहे.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.