कणकवली: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवाला अतिरेक्यांचा धोका होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी शिवसेनाप्रमुखांना मातोश्री सोडायला सांगितले. तेव्हा बाळासाहेबांनी मलाच त्यांच्या संरक्षणासाठी बोलावलं. अज्ञातस्थळी मला घेऊन गेले. उद्धव ठाकरेंना नाही, असा पलटवार नारायण राणे यांनी केला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे अज्ञातस्थळी असल्याच्या अनुभवालाही उजळणी दिली. (narayan rane remember balasaheb thackeray, read What exactly said)
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज समारोप होत आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका करतानाच सामंजस्याची भूमिकाही व्यक्त केली. शिवसेना घडायला आमचाही काही तरी हातभार आहे. जेव्हा साहेबांना धोका होता. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं लगेच मातोश्री सोडा. साहेब अज्ञातस्थळी जाणार होते. साहेबांनी मला बोलवलं. म्हणाले, राणे तू तुझी टीम घेऊन बरोबर ये. कुणाला सांगू नको. मी घरातून निघालो की तुझ्या गाड्या पाठी आल्या पाहिजेत. त्याप्रमाणे आम्ही गेलो. जेवढे दिवस साहेब अज्ञातस्थळी होते. तेवढे मी दिवस झोपलो नाही. साहेबांना दहशतवाद्यांकडून धोका होता. रात्री गाडीत झोपायचो. जागाही नव्हती. बंगल्याच्या बाजूला गाडीत झोपायचो. एवढे लोकं होतो आम्ही. खायाला कुठून तरी आणायला सांगायचो. नाही तर रात्री माँ साहेब काही तरी द्यायच्या, असं राणे म्हणाले.
मातोश्रीच्या बाहेरही बंदोबस्त देताना रात्रभर मच्छर मारत बसायचो. वांद्रयाला किती मच्छर आहे हे तुम्हाला माहीत आहे. त्यांनी साफ केलेला जो नाला आहे मिठी नदीचा… किती मच्छर आहे. सध्या फार वाढलेत साफ होत नाहीत… नाला… म्हणून मी एवढेच म्हणेन आता बस्स करा. महाराष्ट्रातील काही केंद्राशी संबंधित कामे असतील तर कोणतीही गोष्ट लक्षात न ठेवता मी ती कामे करेन, असंही त्यांनी सांगितलं.
बाळासाहेबांच्या जीवाला धोका असल्याचं माहीत झाल्यानंतर ते कर्जतच्या फार्महाऊसवर जाऊन राहिले होते. हे खरं आहे. मात्र, त्यांच्या जीवाला खरंच धोका होता की नाही, याचा काही आगापिछा नव्हता, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं. (narayan rane remember balasaheb thackeray, read What exactly said)
संबंधित बातम्या:
बाळासाहेबांना धोका होता तेव्हा साहेबांनी मला माझ्या लोकांना घेवून बोलवले : नारायण राणे
तर ‘प्रहार’मधून घणाघात करेन, गप्प बसणार नाही; नारायण राणेंचा निर्वाणीचा इशारा
सात जणांची नावं, सुसाईड नोट सेफ्टी पिनने गाठोड्याला अडकवली, कोल्हापुरात महिलेची नदीत आत्महत्या
(narayan rane remember balasaheb thackeray, read What exactly said)