उस्मानाबादमध्ये कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’, गरोदर मातांसह लहान मुलांवर विशेष लक्ष 

उस्मानाबाद जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण महिना अभियान राबविले जात आहे. यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर लहान मुलांच्या पोषण आहाराबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली जाणार आहे. योग्य पोषण आहार दिल्याने मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे. गरोदर माता व नागरिकांच्या लसीकरणावर या मोहिमेत भर देण्यात येणार आहे.

उस्मानाबादमध्ये कोरोनाच्या लाटेचा सामना करण्यासाठी 'अॅक्शन प्लॅन', गरोदर मातांसह लहान मुलांवर विशेष लक्ष 
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 10:26 AM

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान राष्ट्रीय पोषण महिना अभियान राबविले जात आहे. यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर लहान मुलांच्या पोषण आहाराबाबत मार्गदर्शन व जनजागृती केली जाणार आहे. योग्य पोषण आहार दिल्याने मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे. गरोदर माता व नागरिकांच्या लसीकरणावर या मोहिमेत भर देण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी ही संकल्पना मांडली. महिला व बालकल्याण विभागासह आरोग्य, शिक्षण विभागाच्या मदतीने ही मोहीम राबविली जाणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा कुपोषणमुक्त करण्याबरोबरच लहान मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी उस्मानाबाद जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान बालकांना असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना उस्मानाबाद जिल्हा परिषदने लहान मुलांची व गरोदर मातांची विशेष काळजी घेण्याचे  ठरविले आहे. या मोहिमेअंतर्गत पहिल्या आठवड्यात अंगणवाडी, सार्वजनिक जागा व घराच्या मोकळ्या जागेत पोषण वाटिका, परसबाग तयार केल्या जाणार आहेत.

लहान मुलं आणि गरोदर मातांना रोजचा डायट प्लॅन देणार

यात विविध प्रकारची पालेभाज्या लागवडबाबत मार्गदर्शन केले जाणार आहेत. यामुळे नैसर्गिकरित्या तयार झालेली रसायन व खतमुक्त भाजीपाला मिळेल. लहान मुलांनी व गरोदर मातांनी रोज कोणता आहार खावा याचा डायट प्लॅन दिला जाणार आहे. यात गाजर, बिट अशी कंदवर्गीय पिके, मेथी, पालक व इतर पालेभाज्या, फळभाज्या, ताजी फळे यांचा समावेश असणार आहे. मुलांना प्रोटीन, लोह विविध प्रथिने मिळणारे खाद्य रोजच्या आहारात समाविष्ट करण्यावर भर दिला जाणार आहे. ग्रामसेवक व आशा वर्कर यांच्या मदतीने प्रत्येक घरात जाऊन लहान मुलांची नोंद घेतली जाणार आहे. त्यांच्या तब्येतीवर लक्ष दिले जाणार आहे, अशी माहिती राहुल गुप्ता यांनी सांगितली.

विविध प्रकारची खते, रसायन व दूषित हवेमुळे कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. रासायनिक खतांचा व कोणत्याही फवारणीचा वापर न करता पारस बागेत भाजीपाला पिकवला जाणार आहे. तो घरी खाण्यासाठी वापरला जाणार आहे. त्यामुळे या माध्यमातून जिल्हा कॅन्सरमुक्तीचा संकल्प करण्यात येईल अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांनी दिली.

हेही वाचा :

बीड जिल्ह्यात मुसळधार; पालकमंत्री मुंडेंकडून 24 तास सतर्क राहण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना

Marathwada Rain Update : मराठवाड्याच्या पावसाची दमदार बॅटिंग, औरंगाबादमध्ये मुसळधार, परभणीत ढगफूटीसदृश्य, बीडमध्ये सर्वदूर पाऊस

पावसाची दांडी, वातावरणीय बदलाचा फटका, मराठवाडा ते विदर्भ उडीद पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ

व्हिडीओ पाहा :

National Nutrition mission in Osmanabad to reduce risk of children and pregnant women

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.