आमदार नीलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ते आले नि वैतागून गेले…

सत्तेचा कधी गैरवापर केला नाही. सर्वसामान्याला कसा फायदा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचं लंके यांनी म्हंटलंय.

आमदार नीलेश लंके यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ते आले नि वैतागून गेले...
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 9:44 PM

अहमदनगर : अहमदनगरला महाविकास आघाडीचा बाजार समितीच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ करण्यात आलाय. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली. नाव न घेता विखे पिता पुत्रांवर निशाणा साधलाय. सत्तेचा गैरवापर चालू असल्याचा आरोप नीलेश लंके यांनी केला आहे. आम्ही देखील अडीच वर्षे सत्तेत होतो. मात्र सत्तेचा कधी गैरवापर केला नाही. सर्वसामान्याला कसा फायदा होईल, यासाठी आम्ही प्रयत्न केल्याचं लंके यांनी म्हंटलंय.

ईडीवाले आलै वैतागून गेले

तसेच माझी ईडी चौकशी 2022 लाच होऊन गेली, असा गौप्यस्फोट आमदार नीलेश लंके यांनी केलाय. ईडी वाले वैतागून गेले होते. म्हणाले, या नीलेश लंकेकडे काहीच निघत नाही. असं नीलेश लंके यांनी सांगितलं. त्यावेळी मी मनात म्हटलं, उलट ईडीवालेच म्हणतील हे खिशातले पैसे खर्चायला घे. ईडीवाले आले आणि येडे होऊन गेले, असा टोला लंके यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

नीलेश लंके म्हणाले, मला ईडीचा फोन आला. एवढं सोप्प आहे का. संघर्ष आपल्या पाचवीला पुजला आहे. ज्यांना कोणी नडत नाही त्यांना निलेश लंके नडतो, हा इतिहास जिल्ह्यात सर्वांना माहिती आहे, असंही लंके यांनी म्हंटलं.

लंकेवर विश्वास का ठेवतात?

नीलेश लंकेवर लोक का विश्वास ठेवतात. कारण हा माणूस जर एखाद्याच्या विरोधात गेला ना तर त्याचा शेवट करतो. असा इशारा यावेळी त्यांनी दिला. सत्ता गेल्यावर अधिकारी वेड्यावाणी करायला लागले होते. मात्र त्यांना सांगितलं मला काय मागचा नीलेश लंके व्हायला लावू नका.

आम्ही जशात तसे आहोत

आम्ही पण सुसंस्कृत राजकारणी आहोत. मात्र जशास तसे आहोत. हात जोडण्याची तयारी आहे. पाया पडायची तयारी आहे. मात्र वेळप्रसंगी बाह्या वर करायची ताकत आमची आहे. तुम्ही वाकडा पाय टाकला तर आम्ही दोन दोन पावलं वाकडे टाकणार, असा सज्जड दमही नीलेश लंके यांनी दिला.

पिक्चर अभी बाकी हैं

ही गर्दी सांगते की तीस तारखेला निकाल आपलाच आहे. गुलाल आपलाच आहे. आमची यंत्रणा रात्री बारा वाजता चालू होते. ये तो ट्रेलर हैं पिक्चर अभी बाकी हैं, असं म्हणत त्यांनी चांगलीच वाहवा मिळवली.

उद्या मार्केट कमिटी आल्यानंतर सर्वांना नाश्ता फुकट देणार असल्याची घोषणा यावेळी निलेश लंके यांनी केली. महाविकास आघाडीची वज्रमुठ आहे. नगर तालुक्यात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही, असंही नीलेश लंके म्हणाले.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.