कुडाळ मालवणमधून 2024 ला विजयी होणारच, निलेश राणेंनी रणशिंग फुंकलं

भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे 2024 च्या निवडणुकीत मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं असं वक्तव्य केलं आहे. निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली आहे.

कुडाळ मालवणमधून  2024 ला विजयी होणारच, निलेश राणेंनी रणशिंग फुंकलं
निलेश राणे
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 10:01 AM

सिंधुदुर्ग: भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे 2024 च्या निवडणुकीत मी जिंकणार म्हणजे जिंकणारचं असं वक्तव्य केलं आहे. निलेश राणेंनी भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा केली आहे. निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना आतापासून कामाला लागण्याचे आदेश दिलेत. तर दुसरीकडे नारायण राणे यांनी आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही, असा दम नारायण राणेंनी भरलाय.

आजपासून कामाला लागा

निलेश राणेंनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचं जाहीर करतानाच कार्यकर्त्यांना आतापासूनचं कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून निवडणुकीचं रणशिंग फुकंल आहे. निलेश राणे यांनी ही घोषणा करताच सभागृहातील भाजप कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून व घोषणाबाजी करून निलेश राणे यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद दिला.

आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही

नारायण राणे यांनी निलेश राणेंच्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांना चांगलाच दम भरला आहे. तर, निलेश राणेंच्या या घोषणेच्या अनुषंगाने नारायण राणे यांनी कार्यकर्त्यांना गद्दारी चालणार नाही, असा दम भरला आहे. आगामी निवडणुकीत गद्दारी खपवून घेणार नाही. येणा-या निवडणुकीत गद्दारी अजिबात सहन करणार नाही. माझ्या निवडणूकीत जे झाल ते मी सहन केलं. मात्र, पुढच्या निवडणुकीत कोणी गद्दारी केली तर खपवून घेणार नाही. गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच पण दुसरं काय करायला लावू नका, असा सज्जड दम नारायण राणे यांनी कार्यकर्त्याना दिला आहे.

नारायण राणेंची अनिल परब यांच्यावर टीका

सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. रस्त्यावर येण्याची परवानगी असता कामा नये, अशा गाड्या झाल्यात. त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्यानं कमावलंय. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो. तो शिवसेनेचा कलेक्टर आहे ही उद्याची हेडलाईन आहे, असंही म्हणत नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर प्रहार केलाय.

इतर बातम्या:

पोलीस भरतीसाठी उंची वाढवण्याचा प्रयत्न फसला, उमेदवार सोलापूर पोलिसांच्या ताब्यात

अकोल्यात वंचितच्या सत्तेला धक्का; भाजपची महाविकास आघाडीला मदत, दाेन्ही सभापतीपदांची माळ गळ्यात!

”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”, नारायण राणेंचा प्रहार

Nilesh Rane said he will contest and won seat of Kudal Malvan Legislative Assembly election

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.