AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणेंवर अटकेची तलवार? सिंधुदुर्ग न्यायालयात दोन्ही बाजूने वकिलांची फौज, नेमकं काय घडणार?

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संतोष परब हल्ला (Santosh Parab) प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg Session Court) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे.

Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरण, नितेश राणेंवर अटकेची तलवार? सिंधुदुर्ग न्यायालयात दोन्ही बाजूने वकिलांची फौज, नेमकं काय घडणार?
Follow us
| Updated on: Dec 28, 2021 | 7:23 AM

सिंधुदुर्ग: भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संतोष परब हल्ला (Santosh Parab) प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात (Sindhudurg Session Court) अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालय ओरोस येथे ही सुनावणी होणार आहे. या सुनावणी दोन्ही बाजूंच्यावतीनं वकिलांची फौज उभी करण्यात येणार आहे. त्यामुळं सिंधुदुर्ग आणि कोकणच्या राजकारणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामुळं वादंग

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळतोय. राणे विरुद्ध सेना असा संघर्ष यामुळे निर्माण झालाय.

न्यायालयात दोन्ही बाजूनं वकिलांची फौज

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन प्रकरणात उद्या सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात दोन्ही बाजूने वकिलांची फौज उभी केली जाणार आहे. नितेश राणे यांच्यातर्फे बाजू मांडताना अॅड. संग्राम देसाई हे युक्तिवाद करतील. त्यावेळी त्यांच्याबरोबर अॅड राजेंद्र रावराणे, राजेश परुळेकर, उमेश सावंत, अविनाश परब,प्रणिता कोटकर, प्राजक्ता शिंदे या कायदेतज्ज्ञांची टीम सहकार्याला असेल.

सरकारी बाजूकडून अटकपूर्व जामिनाला भक्कम विरोध

विशेष सरकारी वकील म्हणून अ‌ॅड. प्रदीप घरत आणि अ‌ॅड. भूषण साळवी यांची नियुक्ती करण्यात आली असून ते राज्य सरकारतर्फे युक्तिवाद करतील. विशेष सरकारी वकिलांतर्फे नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाला न्यायालयात भक्कमपणे विरोध करण्याची व्यूहरचना आहे. आज दुपारी 2:45 वाजता जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.

नितेश राणेंनी हल्ला केल्याचा संतोष परब यांचा आरोप

भाजपचे आमदार नितेश राणे यांनीच हा हल्ला केल्याचा आरोप पुन्हा एकदा संतोष परब यांनी केलाय. आपण या कटामागे नाही असे सांगणारे नितेश राणे आता अटकपूर्व जामीन का घेतात, असा सवाल देखील संतोष परब यांनी उपस्थित केला आहे. न्यायव्यवस्थेवर आपला विश्वास असून आपल्याला न्याय नक्की मिळेल असा दावाही संतोष परब यांनी केलाय.

इतर बातम्या:

ठाकरे सरकार सत्तेचा दुरुपयोग करतंय, थेट केंद्रीय राज्यमंत्र्यांचा हल्लाबोल; नितेश राणेंची केली पाठराखण

Narayan Rane | अज्ञातवासात जायची आम्हाला गरज नाही, नितेश राणे सिंधुदुर्गातच आहेत – नारायण राणे

Nitesh Rane file anticipatory bail application live updates at Sindhudurg district session court in Santosh Parab attack case hearing today

मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?
मुख्यमंत्री व्हावं वाटतं अन् कधी ना कधी... दादांना म्हणायचंय तरी काय?.
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा
'लाडकी बहीण'च्या निधीवरून शिरसाट भडकले, थेट दादांच्या खात्यावर निशाणा.
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा
पाकिस्तानच्या मंत्र्यानं डिवचलं, पुढच्याच क्षणी भारतानं दाखवला इंगा.
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी
'सिंधू'वरून पाकचा थयथयाट, संरक्षणमंत्र्यांची पुन्हा भारताला पोकळ धमकी.
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा
सिंधूत रक्त सांडू..भुट्टोचा जळफळाट, भारताविरुद्ध युद्धाचा पुन्हा इशारा.
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?
लाडक्या बहिणींनो Good News, एप्रिलचा हफ्ता जमा, तुम्हाला मेसेज आला का?.
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?
दहशतवाद संपवण्यासाठी..., मोदींनी पुन्हा पाकला हादरवलं; काय दिला इशारा?.
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा
भारताकडून धोका... पाकचा रडका डाव, UNचा पाक सदस्य असीम अहमदचा दावा.
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे....
बांगलादेशी मेजर जनरलने ओकली गरळ आता सरकार म्हणतंय, भारतासोबत आमचे.....
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?
युद्धाची धास्ती अन् भेदरलेल्या पाकिस्तानने आता कोणापुढं पसरले हात?.