चार नव्हे इतक्या मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे, विनायक राऊत यांनी फटकारले
राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले, अनेक मंत्र्यांना डच्चू देण्याची आवश्यकता आहे.
रत्नागिरी : शिंदे गटाच्या चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा मोठा दावा केला. शिंदे यांच्या चार मंत्र्यांना हटवण्याचे केंद्रातून दबाव असल्याचे संजय राऊत म्हणाले. दुसरीकडं मंत्र्यांच्या कामाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी बैठक बोलवली आहे. अशी माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. त्यामुळे राऊत यांच्या दाव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. यासंदर्भात बोलताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत म्हणाले, अनेक मंत्र्यांना डच्चू देण्याची आवश्यकता आहे.
१० मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे
चार ऐवजी १० मंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे. चार मंत्री बोलघेवडे मंत्री आहेत. त्यांची मंत्रीपदे गेली पाहिजेत. मंत्र्याच्या माध्यमातून कुठलीच कामे जनतेची होत नाही, असा आरोपही विनायक राऊत यांनी लावला. प्रताप जाधव यांनी नितीमत्ता शिकवण्याची भाषा करू नये. उद्धव ठाकरे यांनी एक कातळ शिल्प पाहिले. कातळ शिल्पावर अभ्यास होणं गरजेचं आहे. कातळशिल्पाचे संवर्धन जतन करणे यासाठी नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचंही विनायक राऊत यांनी म्हंटलं.
वारकऱ्यांवर लाठीचार्ज, दारुवाल्यांना आश्रय
वारकऱ्यांवर लाठीचार्ज हा अत्यंत निदनीय प्रकार काल घडला. संत परपंरा वारकरी परंपरा आहे. त्यांनी जगाला आदर्श घडवून दिलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी लाठी चार्ज केला. त्याची निंदा करतो, असंही विनायक राऊत म्हणाले. सरकारला काही वाटेनासे झालंय. बेशर्मी लोकांचे हे सरकार वारकऱ्यांना धोपटता आणि दारु वाल्यांना आश्रय देतायत, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. लव्ह जिहादवाल्यांना कायद्यांनी बंदी घातली पाहिजे. औरंगजेबाचे भूत असंच आलं नाही. एमआयएमच्या माध्यमातून हे भूत भाजपने आणलंय. भाजप आणि मिंधे घट उरावर बसणार. त्याची सुरवात डोंबीवलीपासून झाली.
शिंदे गटाचे खासदार असलेल्या ठिकाणी भाजप कामाला
मिंधे गटाचे खासदार आहेत त्या ठिकाणी भाजप कामाला लागली आहे. आज ना उद्या स्फोट होणार होता, त्याची सुरवात डोंबिवलीपासून झाली. जातीय प्रसार प्रचार करून हिंदू धर्मावर अन्याय होत असेल तर त्याची जबाबदारी सरकारची आहे. राहूल कुल भाजपसाठी मिंधे गटाचे काम करणार नाही तर ते भाजपचे काम करणार आहेत.
भष्ट्राचारात गुंतलेले मिंधे गटाचे मंत्री आहेत. एकालाही काम करण्याचा नैतिक अधिकार नाही. मिंधे सरकारमध्ये जेवढा भष्ट्राचार झालाय तेवढा कुठे झालेला नाही, अशा घणाघातही विनायक राऊत यांनी केलाय.