Chandrapur Tiger | 7 जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश, चंद्रपूर जिल्ह्यात नरभक्षक वाघाची दहशत
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाघाचा धुमाकूळ आहे. त्यामुळं लोकांना फिरणं मुश्कील झालंय. मुलांना शाळा-कॉलेजात जाणं कठीण झालंय. शेतकरी शेतातील कामं करू शकत नाहीत. आठ-दहा दिवसांच्या कालावधीत तीन जणांना या वाघानं बळी घेतला. अजूनही तो वाघ गावाच्या फोवताल फिरतो.
चंद्रपूर : T-149 या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्यवनसंरक्षक यांनी दिले. मूल तालुक्यात या वाघाच्या हल्ल्यात किमान 6 ते 7 लोकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. T-149 हा 7 ते 8 वर्षांचा नर आहे. या वाघाचा मूल तालुक्यातील भादूरणा (Bhadurna), रत्नापुर, मारोडा, पडझरी, काटवन आणि करवन परिसरात वावर आहे. या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात सुरू असलेल्या वाघांच्या हल्ल्यांवर तोडगा काढण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. शोभाताई स्थानिक ग्रामस्थांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) पोचल्या होत्या. वाघांच्या हल्ल्यांवर तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) आणि ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वाघाला ठार करण्याचा दिला होता इशारा
या बैठकीत मूल तालुक्यात वाघांचे हल्ले सुरु असलेल्या करवन, काटवल आणि आजूबाजूच्या गावांमध्ये वनविभागाने सोलर कुंपण, झुडपांची कटाई, गस्त वाढविणे आणि रस्त्यांची डादडुजी सारख्या उपाययोजना तातडीने करण्याचे मान्य केले होते. ग्रामस्थांनी वनविभागाला या कामासाठी दहा दिवसांची मुदत दिली. सोबतच वाघाचा बंदोबस्त करण्यात न आल्यास वाघाला मारण्याची मागणी करू असा देखील शोभाताई फडणवीस यांनी इशारा दिलाय.
शेती कशी करायची असा प्रश्न
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून वाघाचा धुमाकूळ आहे. त्यामुळं लोकांना फिरणं मुश्कील झालंय. मुलांना शाळा-कॉलेजात जाणं कठीण झालंय. शेतकरी शेतातील कामं करू शकत नाहीत. आठ-दहा दिवसांच्या कालावधीत तीन जणांना या वाघानं बळी घेतला. अजूनही तो वाघ गावाच्या फोवताल फिरतो. लोकांना दिसतो. त्यामुळं त्याचा बंदोबस्त केला नाही, तर लोकांनी जगायचं कसं असा सवाल शोभाताई फडणवीस यांनी केलाय. वाघानं बळी घेतल्यापासून जीवाची भीती निर्माण झाली आहे. घराबाहेर पडावं की नाही, असं वाटायला लागलंय. तो वाघ त्याचं भागात फिरतो. वाघाचा भाग होत असेल, तर लोकांनी शेती कशी करायची. जगायचं कसं असा सवाल शोभाताई फडणवीस यांनी केलाय.
सोलर लावण्याची मागणी
कोअर झोनमध्ये सोलर लावून जंगलातील वाघांचा बंदोबस्त करा, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी केली होती. झुडपात वाघ लपला असेल तर तो आपल्याला दिसत नाही. भादूरणा, रत्नापूर, मारोडा, पडझरी, काटवन आणि करवन ही गाव आदिवासी आहेत. या भागात रस्ते चांगलं तयार करणं गरजेचे आहे. बस सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.