पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरकरांना तीन आशीर्वाद मागितले; या तीन गोष्टी कोणत्या?

या मार्गाच्या बाजूला मोठे डेरेदार वृक्ष लावा, तसेच रस्त्याच्या दुतर्फा पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करा आणि पंढरपूरला स्वच्छ ठेवा. या तीनच गोष्टी मला तुमच्याकडून हव्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. (PM narendra modi Addresses a programme on infra modernisation in Pandharpur Maharashtra)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंढरपूरकरांना तीन आशीर्वाद मागितले; या तीन गोष्टी कोणत्या?
PM narendra modi
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 5:39 PM

पंढरपूर: मला पंढरपूरकरांकडून तीन महत्त्वाचे आशीर्वाद मागितले आहेत. तुमच्याकडून मला हे तीन आशीर्वाद मिळालेच पाहिजे, असं सांगतानाच या मार्गाच्या बाजूला मोठे डेरेदार वृक्ष लावा, तसेच रस्त्याच्या दुतर्फा पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करा आणि पंढरपूरला स्वच्छ ठेवा. या तीनच गोष्टी मला तुमच्याकडून हव्या आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. मोदींनी हे आवाहन करताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंढरपूर पालखी मार्गाचे चौपादरीकरण भूमिपूजन व राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंढरपूरकरांशी संवाद साधला. मोदींनी आज हिंदी आणि मराठीतून संवाद साधतानाच मध्येमध्ये संत वचनाची, अभंगांची पखरणही केली. यावेळी त्यांनी संतांच्या शिकवणुकीतील वैश्विकता अधोरेखित करतानाच केंद्र सरकार तीर्थक्षेत्रांसाठी करत असलेल्या विकास कामांचीही माहिती दिली. मला तुमच्याकडून तीन आशीर्वाद हवे आहेत. त्या तीन गोष्टी तुम्ही देणार ना? असा मराठीत सवाल करत मोदींनी तीन गोष्टींची हमी पंढरपुरकरांकडून घेतली. दोन्ही पालखी मार्गाचं निर्माण होत असतानाच त्याच्या आजूबाजूला सावली देणारे डेरेदार वृक्ष लावा. मार्गालगतच्या गावातील गावकऱ्यांनी ही जबाबदारी घ्या. मला तुमच्याकडून हा पहिला आशीर्वाद हवा आहे. दुसरा आशीर्वाद म्हणजे या रस्त्यांच्याकडेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचे प्याऊ बनवा. 21 दिवस भक्त वारीला येतात. वारीत तल्लीन होतात. त्यामुळे त्यांच्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी जागोजागी असायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वच्छ आणि सुंदर तीर्थक्षेत्रं म्हणून पंढरपूरचा विकास करा. भारतातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर तीर्थस्थळ म्हणून पंढरपूरचा लौकीक वाढला पाहिजे, असं मोदी म्हणाले.

विठू माऊलीच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटतात

पंढरपूरने भक्तीच्या शक्तीने मानवतेची ओळख करून दिली. लोक देवाकडे काही मागायला येत नाही. नुसत्या विठू माऊलीच्या दर्शनाने त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटतात. त्यामुळेच देव युगानुयुगे कमरेवर हात ठेवून उभे आहेत. भक्त पुंडलिकाने आईच्या डोळ्यात देवाला पाहिलं होतं. पुंडलिकाने नर सेवा हीच नारायण सेवा मानली होती. आजपर्यंत आपला समाज हाच आदर्श घेऊन चालला आहे. जीव मात्राची सेवा हीच साधना मानत आहे. प्रत्येक वारकरी निष्काम सेवा करत आहे. अमृत कलश दान, अन्न दान हे गरीबांच्या सेवाचे प्रकल्प इथे सुरू आहेत. आपल्याकडे आस्था आणि भक्ती राष्ट्र सेवा आणि राष्ट्रभक्तीशी जोडलेली आहे. सेवा दिंडी ही याचं उदाहरण आहे. सेवा दिंडी हे एक माध्यम आहे, असं मोदी म्हणाले.

वारी म्हणजे पिपल्स मुव्हमेंट

पंढरपूरची वारी ही जगातील सर्वात प्राचीन वारी आहे. जनतेचा मोठा सहभाग असलेली ही वारी आहे. पिपल्स मुव्हमेंट म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. आषाढी एकादशीतील पंढरपुरातील विहंगम दृश्य कोण विसरू शकेल. हजारो-लाखो भाविक या यात्रेच्या दिशेने आपोआप ओढले जातात, असं त्यांनी सांगितलं.

वारीत भेदाभेद अमंगळचा प्रत्यय

भूतकाळात भारतावर अनेक आक्रमण झाली. आपला देश शेकडो वर्ष गुलामीत होता. नैसर्गिक आपत्ती आली, आव्हान आली, पण विठ्ठलावरील आपली आस्था तसूभरही ढळली नाही. वारीच्या माध्यमातून आपली दिंडी अनवरत सुरूच राहिली, असं त्यांनी सांगितलं. वारकरी आंदोलनाचं एक वैशिष्ट्ये म्हणजे या आंदोलनात पुरुषांच्या पावलांवर पावलं ठेवून महिलाही सहभागी होतात. देशाची स्त्री शक्ती इथेच दिसते. पंढरीची वारी म्हणजे समानतेची संधीच आहे. म्हणूनच भेदाभेद अमंगळ हे या वारीच्या आंदोलनाचं ध्येय वाक्य आहे, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

पाण्याला खळखळाट, तसा भक्तिसागराच्या पाण्याला विठूनामाच्या गजराचा सुंदर नाद : मुख्यमंत्री

Narendra Modi LIVE in Pandharpur : देशात हायवे, रेल्वेरुळ, मेट्रोलाईन, नवे एअरपोर्ट उभारण्याचे काम- मोदी

पंढरपूरकडे जाणारे हे मार्ग भागवत मार्गाची पताका आणखी उंचावेल: पंतप्रधान नरेंद्र मोदी

(PM narendra modi Addresses a programme on infra modernisation in Pandharpur Maharashtra)

Non Stop LIVE Update
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.