Nandurbar Police | नंदुरबारच्या शहाद्यात पोलीस-नागरिक संघर्ष; पोलिसांनी हाताळली योग्य पद्धतीने जबाबदारी
पोलीस प्रशासनावर आणखीच जास्त ताण वाढला. शहरात पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती होईल का, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती. शहादा पोलीस दलाच्या वतीने परिस्थिती सामंजस्याने नियंत्रणात आणली.

नंदुरबार : जिल्ह्यातील शहादा पोलीस दलाने कर्तव्यदक्ष कामगिरी दाखवली आहे. गेले काही दिवस शहादा शहरातील परिस्थिती तणावपूर्ण होती. एप्रिल महिन्यात रामनवमीच्या वेळी शहाद्यात नागरिक विरुद्ध पोलीस असा संघर्ष झाला होता. त्यामुळं नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल रोष निर्माण झाला होता. त्यासाठी नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर (Inspector General of Police b. G. Shekhar) यांनी स्वतः शहादा येथे येऊन शहराच्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत (Inspector of Police Deepak Budhwant) यांच्यावर काही कारवाई होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र दीपक बुधवार यांना काही दिवसांसाठी वैद्यकीय रजेवर पाठवण्यात आले. पोलीस ठाण्याची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे (Assistant Inspector of Police Rajendra More) यांच्याकडे देण्यात आली. राजेंद्र मोरे यांनी शहादा पोलीस स्टेशनची जबाबदारी सांभाळली.
बैठका घेऊन नागरिकांची समजूत
शहरातील प्रत्येक समाजातील बैठका घेऊन नागरिकांची समजूत घातली. येणाऱ्या काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंती, महावीर जयंती, हनुमान जन्मोत्सव, रमजान ईद, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा, अशा महत्त्वाच्या सणांचा बंदोबस्त करायचा होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भोंग्यासंबंधी आंदोलनासाठी योग्य ते बंदोबस्त लावून चांगली कामगिरी करून दाखवली. याच दरम्यान राज्यात भोंग्याचा विषय सुरू झाला. पोलीस प्रशासनावर आणखीच जास्त ताण वाढला. शहरात पुन्हा तणावग्रस्त परिस्थिती होईल का, अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात होती. शहादा पोलीस दलाच्या वतीने परस्थिती सामंजस्याने नियंत्रणात आणली. त्यामुळे नागरिकांकडून पोलीस दलाच्या कौतुक करण्यात येत आहे.
चोरीला गेलेले पैसे पोलीस फंडातून
खाकीतील देव माणूस असतो. याचे उत्तम उदाहरण पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दाखवला होता. गेल्या काही दिवसांपूर्वी वयोवृद्ध पदम कोळी या व्यक्तीचे 50 हजार रुपये चोरीला गेले होते. ते पैसे त्यांनी पोलीस फंडातून देऊन माणुसकी जागा ठेवण्याचे काम केलं होतं. तेवढ्यातच न थांबता पोलिसांना योग्य मार्गदर्शन करून लवकर पैसे मिळवून देण्याचे काम देखील करण्यात आलं होतं. मात्र शहरातील या घटनेमुळे पोलीस विरुद्ध नागरिक असे असताना प्रभारी पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी योग्यवेळी मार्गदर्शन केले. शहरातील नागरिकांना संयम ठेवण्याच्या आव्हान केलं. पोलिसांना देखील सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार सण-उत्सव सर्वच आनंदात साजरे करण्यात आले. येणारा काळात कुठलाही शहराला गालबोट लागू नाही, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज राहणार असल्याच्या पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. संवेदनशील परिस्थितीत महत्वाचे व धार्मिक सण अतिशय शांततेत पार पाडले.



