AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar Crime : आधी बालिकेवर लैंगिक अत्याचार, मग गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला बेड्या

घरातून बेपत्ता मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने ही घटना पाहिली. तिने ताबडतोब नराधमाला जागेवरच पकडून आरडाओरडा केला. पिडित बालिकेचे वडील येत असल्याचे पाहून त्या नराधमाने पीडित बालिकेच्या आईला ढकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या बालिकेचा जीव वाचला.

Ahmednagar Crime : आधी बालिकेवर लैंगिक अत्याचार, मग गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न; आरोपीला बेड्या
आधी बालिकेवर लैंगिक अत्याचार, मग गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 6:59 PM
Share

अहमदनगर : एका पाच वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार (Rape) करुन नंतर गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरात घडली आहे. मुलीला मारण्याचा प्रयत्न करत असतानाच मुलीची आई तिथे आली, त्यामुळे मुलीचा जीव वाचला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीला राहुरी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. किशोर ऊर्फ केश्या विजय पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीविरोधात अपहरण (Kidnapping), बलात्कार तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम कायदा कलमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सज्जन नाऱ्हेडा करीत आहेत.

मुलगी घरात एकटी असताना तिचे अपहरण करुन अत्याचार केला

राहुरी तालुक्यातील आरडगावात पीडिता आणि आरोपी राहतात. शनिवारी दुपारी 12.30 च्या सुमारास पीडित मुलीचे आई-वडिल बाहेर गेले होते. मुलगी घरात एकटीच असल्याची संधी साधत आरोपी किशोरने घरातून मुलीला उचलून नेले. गावातील एका नारळाच्या झाडाजवळ शेताच्या बांधाजवळ बालिकेचे कपडे काढले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिच्याच कपड्याच्या सहाय्याने गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातून बेपत्ता मुलीचा शोध घेत असलेल्या तिच्या आईने ही घटना पाहिली. तिने ताबडतोब नराधमाला जागेवरच पकडून आरडाओरडा केला. पिडित बालिकेचे वडील येत असल्याचे पाहून त्या नराधमाने पीडित बालिकेच्या आईला ढकलून घटनास्थळावरून पसार झाला. नशीब बलवत्तर म्हणून त्या बालिकेचा जीव वाचला. बालिकेला उपचारासाठी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात नेण्यात आले.

घटनेचे गांभीर्य ओळखून श्रीरामपूर येथील अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके, श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र खाडे, पोलीस उप निरीक्षक एस बी देवरे, राहुरी पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक निरज बोकील, सज्जन नाऱ्हेडा आदी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलीस पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला गजाआड केले. (Police have arrested a man accused of abusing a five year old girl in Ahmednagar)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.