Akola Crime : अकोल्यात दोघांचे अपहरण करणाऱ्या 3 खंडणी बहाद्दरांना पोलिसांनी केली अटक

शहरातल्या शिवापूर खडकी येथील 27 वर्षीय ऋषिकेश हनुमान ढेंगळे यांच्या तक्रारीनुसार त्यांचा 35 वर्षीय मोठा भाऊ प्रशांत हनुमान ढेंगळे हा कीर्तन, प्रवचन करतो. तो त्याचा मित्र गौरव खारोळे याच्यासोबत दुचाकी आणण्यासाठी गेला होता. परंतु त्याचे आरोपी पप्पू ठाकूर, वेदांत साबळे आणि ऋषिकेश पातोंड या तिघांनी अपहरण केले आणि त्यांना अज्ञातस्थळी नेवून डांबून ठेवले.

Akola Crime : अकोल्यात दोघांचे अपहरण करणाऱ्या 3 खंडणी बहाद्दरांना पोलिसांनी केली अटक
अकोल्यात दोघांचे अपहरण करणाऱ्या 3 खंडणी बहाद्दरांना पोलिसांनी केली अटक
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 7:14 PM

अकोला : कीर्तन, प्रवचन करणाऱ्या एका महाराजासह त्याच्या मित्राचे तिघा जणांनी 8 मार्च रोजी दुपारी अपहरण (Kidnapping) करून 7 लाख 50 हजारांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या तीन खंडणी बहाद्दरांना पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 तासांत तपास करून तिघा आरोपींना बेड्या ठोकल्या. पप्पू ठाकूर, वेदांत साबळे आणि ऋषिकेश पातोंड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर प्रशांत हनुमान ढेंगळे आणि गौरव खारोळे अशी अपहरण केलेल्या दोघांची नावे आहेत. (Police have arrested three kidnappers in Akola)

जीवे मारण्याची धमकी देवून साडे सात लाखाची खंडणी मागितली

शहरातल्या शिवापूर खडकी येथील 27 वर्षीय ऋषिकेश हनुमान ढेंगळे यांच्या तक्रारीनुसार त्यांचा 35 वर्षीय मोठा भाऊ प्रशांत हनुमान ढेंगळे हा कीर्तन, प्रवचन करतो. तो त्याचा मित्र गौरव खारोळे याच्यासोबत दुचाकी आणण्यासाठी गेला होता. परंतु त्याचे आरोपी पप्पू ठाकूर, वेदांत साबळे आणि ऋषिकेश पातोंड या तिघांनी अपहरण केले आणि त्यांना अज्ञातस्थळी नेवून डांबून ठेवले. त्यानंतर आरोपी ऋषिकेश पातोंडने त्याच्या भावाला पैशासाठी फोन केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर प्रशांतच्या भावाने त्याचा मित्र गौरव खारोळे याला फोन केल्यावर त्याने पप्पू ठाकूर याने पैशासाठी आपले अपहरण केल्याचे सांगितले. त्यानंतर पप्पू ठाकूर याने भावाला जीवे मारण्याची धमकी देत 7 लाख 50 हजार रुपयांची खंडणी मागितली.

यापैकी ऋषिकेश ढेंगळे याने दीड लाख रुपये दिले. त्यानंतर 9 मार्च रोजी दुपारी पुन्हा आरोपींनी सहा लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणात खदान पोलिसांनी भादंवि कलम 364 (अ ) , 386 ( 34 ) नुसार गुन्हा दाखल केला असून स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी 24 तासांमध्ये आरोपींचा तपास लावत त्यांना बेड्या ठोकल्या. नेमकी ही खंडणी व्याजाच्या पैशातून की अजून कुठल्या प्रकरणातून घेण्यात आली आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.

कल्याणमध्ये सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

मुंबई ठाणे परिसरात तब्बल 41 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण तेवर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आरोपीने घरफोड्या करताना टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवली होती. नारायण हा मूळचा तामिळनाडूमधील रहिवासी आहे. नारायण गेली अनेक वर्ष मुंबई, ठाणेसह आसपासच्या भागात घरफोड्या सारखे गुन्हे करत होता. मागील तीन महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा भोगून जेलमधून परतला होता. कल्याणमधील एका दुकानातील चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (Police have arrested three kidnappers in Akola)

इतर बातम्या

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, सासरच्या विरोधामुळे सहा वर्षांच्या लेकासह पोलिसात धाव

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.