Ichalkaranji : शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

पाच हजार रुपये मागणी केली होती पण तडजोड करुन चार हजार रुपये घेतले होते. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईत महसूल अधिकारी पोलीस प्रशासन महावितरण अधिकारी लाच मागताना रंगेहाथ सापडले आहेत.

Ichalkaranji : शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 6:40 PM

इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक पांडुरंग गुरव चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. इचलकरंजी शहरामध्ये लाच लुचपत विभागाच्या मार्फत सतत कारवाई होत आहे. शहरातील शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस नाईक पांडुरंग गुरव यांनी एका गुन्ह्यामध्ये आरोपीला मदत करतो असे सांगून पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याची तक्रार तक्रारदार यांनी कोल्हापूर लाचलुचपत विभागाला कळवली होती. त्या अनुषंगाने आज शहापूर परिसरामध्ये पोलीस नाईक पांडुरंग यांना चार हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.

चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले

पाच हजार रुपये मागणी केली होती पण तडजोड करुन चार हजार रुपये घेतले होते. लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभागाच्या कारवाईत महसूल अधिकारी पोलीस प्रशासन महावितरण अधिकारी लाच मागताना रंगेहाथ सापडले आहेत. त्यामुळे लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे नागरिकातून त्यांचे कौतुक होऊ लागले आहे. पोलीस लाचलुचपत जाळ्यात येत आहेत.

सरकारी अधिकारी, कर्मचारी राजरोसपणे करतात पैशांची मागणी

शहरामध्ये महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, महावितरणमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी राजरोसपणे केली जाते. कारवाई होऊन सुद्धा शासकीय कर्मचारी सुधारण्याच्या मार्गावर दिसून येत नाहीत. पण या कारवाईमुळे काहीतरी थोडासा या लाचखोर अधिकाऱ्यांना चाप बसत आहे. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक सतीश मोरे, स.फौ. संजीव बंबरगेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस नाईक विकास माने, पोलीस नाईक सुनिल घोसाळकर, पोलीस नाईक नवनाथ कदम, पोलीस कॉन्स्टेबल मयुर देसाई, ला.प्र .वि .कोल्हापूर युनिट पर्यवेक्षक अधिकारी आदिनाथ बुधवंत, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र. वि., कोल्हापूर यांचा सहभाग होता. (Police Naik of Shahapur police station caught in bribery department)

इतर बातम्या

Nitesh Rane | नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात जाणार; वकिलांची माहिती

Pimpri -Chinchwad crime | पाच जणांच्या टोळक्याने ब्लेडने वार करत युवकाला लुटले

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.