Rajesh Tope :तज्ज्ञांच्या मते कोरोना मार्चच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येणार, राजेश टोपेंनी नेमकं काय सांगितलं?

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना विषाणू संसर्ग, तिसरी लाट आणि वाईनच्या सुपर मार्केटमध्ये दिलेल्या परवानगीवरुन करण्यात आलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे.

Rajesh Tope :तज्ज्ञांच्या मते कोरोना मार्चच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येणार, राजेश टोपेंनी नेमकं काय सांगितलं?
आरोग्यमंत्री राजेश टोपे
Follow us
| Updated on: Jan 30, 2022 | 10:18 AM

सोलापूर : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कोरोना विषाणू संसर्ग, तिसरी लाट आणि वाईनच्या सुपर मार्केटमध्ये दिलेल्या परवानगीवरुन करण्यात आलेल्या टीकेवर भाष्य केलं आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाची (Corona) लाट मार्च महिन्याच्या मध्यावधीपर्यंत संपुष्टात येऊ शकते, असं राजेश टोपे म्हणाले. कोरोनाचा न्यूकॉन हा नवा व्हेरीएंट पुढे येत आहे. याबाबतच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पण, राज्यातील सद्य स्थितीआधारे तज्ञांच्या मतानुसार मार्चच्या मध्यावधीपर्यंत कोरोनाची लाट संपुष्टात येऊ शकते, अशी दिलासादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पंढरपूर मध्ये दिली. तसेच भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांची प्रकृती स्थिर आहे. लतादीदी यांना लावण्यात आलेली कृत्रिम श्वसनव्यवस्था काढण्यात आली आहे. त्यामुळे लतादीदी यांची प्रकृती सुधारत असल्याचे राजेश टोपे सांगितले.

न्यूकॉनचा एकही रुग्ण भारतात नाही

न्यूकॉन हा नवा व्हेरीएंट चीन मधून आला आहे. याबाबतची जागतिक आरोग्य संघटनाकडून अद्याप माहिती नाही. मात्र, या नव्या विषाणूमध्ये मृत्यूदर अधिक असल्याचे सांगितले जाते. पण, सध्या या नव्या विषाणूचा कुठलाही रूग्ण आपल्या देशात नाही. त्यामुळे सध्या कुठलीही चिंता नाही.

राज्यात मास्कमुक्ती नाही

राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात सध्या मास्कमुक्ती होणार नाही. सध्या संसर्गाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे तज्ञांच्या मतानुसार मार्च महिन्याच्या मध्यावधी पर्यंत कोरोना संसर्ग संपुष्टात येऊ शकतो. तरीही नागरीकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांनी कले. टोपे यांनी यावेळी विठ्ठलरुक्मिणीचे दर्शन घेत लता मंगेशकर यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घातले.

आम्ही कुणाला वाइन प्या असं सांगत नाही

राजेश टोपे यांनी शेतकरी द्राक्ष बागायतदार यांना प्रोत्साहन देण्यासाठी किराणा दुकानात आणि मॉलमध्ये वाइन विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.आरोग्य विभाग कधीही मद्यपानाला प्रोत्साहन देऊ शकत नाही, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना दिली. आम्ही कुणाला वाईन प्या असे म्हणू शकत नाही, सिगारेटवरही धोक्याची सूचना लिहिलेली असतेच त्यामुळे जगामध्ये अशा गोष्टी सूचना देऊन विकल्या जातात, मद्यपान हानिकारक आहेच त्याविषयीची जागृती आपण करत असतो असं वक्तव्य आरोग्य मंत्री यांनी सोलापुरात केलंय.

इतर बातम्या:

Positive News: खरिपात झालेले नुकसान उन्हाळी हंगामातून भरुन निघणार..! सोयाबीनला फलधारणा

प्रधान सल्लागारानेच सहयोगी पक्षाच्या प्रतिष्ठेची लक्तरे उडविली; मुख्यमंत्री उत्तर देणार काय?, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

Rajesh Tope said experts predicted corona virus will end in March Month

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...