“खाचखळग्यातून जाणारे तुम्ही, तुमच्याबद्दल या लोकांना आपुलकी शुन्य”; राज ठाकरे यांनी राजकारण्यांच्या नजरेतून मतदारांची किंमत सांगितली
राज ठाकरे यांनी विकासाच्या प्रकल्पावरून ते अगदी कोकणचा निर्सग, बारसू प्रकल्प, नानार प्रकल्प यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तर त्याच वेळी त्यांनी मतदारांनाही सुनावले.
रत्नागिरी : राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी कोकणात सभा घेणार असल्याचे सांगितले होते, त्यानंतर आज त्यांनी रत्नागिरीत सभा घेतली. यावेळी त्यांनी आमदारांच्या पक्षप्रवेशापासून ते अगदी सध्या सुरु असलेल्या शरद पवार यांच्या राजीनाम्या नाट्यावरही टीका टिप्पणी केली. यावेळी त्यांनी अजित पवार यांची नक्कल करत अजित पवार यांच्यामुळेच शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतला असल्याचे सांगत त्यांनी एकाच वेळी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका केली. राज ठाकरे यांनी राजकारण्यांपासून ते अगदी मतदारांवर त्यांनी सडकून टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले की, 2007 साली जेव्हा आपण कोकणचा दौरा केला होता.
त्यावेळीही कोकणचे रस्ते तसेच होते, आणि आताही या रस्त्यांची अवस्था तशीच होती. त्यावेळी त्यांनी कोकणच्या रस्त्यांची झालेली दुर्दशा थेट देवेंद्र फडणवीस ते नितिन गडकरी यांना सांगितली तरी त्याची अवस्था जैसे थेच आहे.
. रस्त्याच्या विकासाच्या मुद्यावरून त्यांनी मतदारांचेही कान टोचले. मतदारांना गृहित धरल्यामुळेच कोकणच्या विकासाचे तीन तेरा वाजले आहेत असा घणाघातही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी विकासाच्या प्रकल्पावरून ते अगदी कोकणचा निर्सग, बारसू प्रकल्प, नानार प्रकल्प यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. तर त्याच वेळी त्यांनी मतदारांनाही सुनावले.
कोकणातील शंभर-शंभर एकर जमीन हडप केली जाते तरीही कोकणातील माणसं गप्प का आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
कोकणातील रस्ते, जमीन आणि राजकारणाविषयी बोलताना राज ठाकरे यांनी विकासाच्या मुद्यावरून राज्य आणि केंद्र सरकारवरही त्यांनी सडकून टीका केली.
यावेळी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यावरही सडकून टीका केली. राजीनामा दिल्यानंतर त्याचा खरा आनंद हा अजित पवार यांना झाला होता.
त्यांच्या त्या बोलण्यावरून आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या वक्तव्यावरूनच शरद पवार यांनी राजीनामा मागे घेतला असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.