Amol Mitkari : राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांसमोर अमोल मिटकरींविरोधात तक्रारींचा पाढा, जिल्हा परिषद सदस्य म्हणतात, कमिशन भेटल्याशिवाय निधी मिळत नाही
संदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आढावा बैठकीतील या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले आहे.
अकोला : अकोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे रविवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले होते. अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. या आढावा बैठकीत राकाँच्या युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष व जिल्हा परिषद सदस्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून निधी मिळत नाही. दिला तर त्यावर कमिशन मागितले जात असल्याचा आरोपी प्रदेशांपुढे केला. त्यामुळे राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष (District President) शिवा मोहोड (Shiva Mohod) व राष्ट्रवादीचे कार्यकर्ता विशाल गावंडे (Vishal Gawande) यांनी मिटकरी हे कमिशन घेतल्याशिवाय निधी देत नसल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात मिटकरी यांना फोन केला. परंतु, त्यांनी मोबाईल रिसिव्ह केला नाही. त्यानंतर त्यांचा नंबर नॉट रिचेबल दाखवत होता. जिल्हाध्यक्षांना वीस लाख रुपयांचा निधी देताना दोन लाख रुपयांचं कमिशन घेतल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या बैठकीत करण्यात आला.
पाहा व्हिडीओ
अमोल मिटकरींविरोधात व्हायरल झालेला व्हिडीओ. यात करण्यात आलेत गंभीर आरोप pic.twitter.com/kvttyTNIVQ
हे सुद्धा वाचा— Govind Hatwar (@GovindHatwar) August 30, 2022
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील सदस्य अमोल मिटकरी हे नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असतातच. विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विधिमंडळ आवारात आमदारांमध्ये झालेल्या धक्काबुक्की प्रकरणात ते चांगलेच वादग्रस्त ठरले होते. आता अकोला जिल्ह्यात त्यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी निधीसाठी कमिशन घेत असल्याचा जाहीर आरोप केला आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे पदाधिकाऱ्यांनी तक्रारीचा पाढा वाचण्यात आला आहे. त्यासंदर्भातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या आढावा बैठकीतील या तक्रारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऐकून घेतल्या. त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले आहे.
प्रदेशाध्यक्षांनी बंद करायला सांगितले रेकॉर्डिंग
पण राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी आमदार अमोल मिटकरी हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त झाले आहे. मात्र, त्यांनी आतापर्यंत जिल्ह्यात 50 कोटींचा निधी आणल्यानंतर त्यातून पक्षाच्या सदस्यांना विकास कामांसाठी निधी दिला नसल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे जिल्हाध्यक्षांना 20 कोटींचा निधी देताना आमदारांनी कमिशन मागितल्याचा आरोपही खुद्द राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहड आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशाल गावंडे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये केला आहे. तेव्हा जयंत पाटलांनी हे रेकॉर्डिंग बंद करायला सांगितले. अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड व राष्ट्रवादीचे कार्यकर्ता विशाल गावंडे यांनी दिली.