कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन

शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 5 ते 9 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकान खुली होणार आहेत. | Restrictions in Kolhapur city lifted for five days

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवले, राज्य शासनाचा निर्णय; पण पालकमंत्र्यांचं कळकळीचं आवाहन
कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 8:19 AM

कोल्हापूर : शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. (Restrictions in Kolhapur city lifted for five days State Government Decision Satej patil Appeal To kolhapurkar)

हटवलेल्या निर्बंधानंतर 5 ते 9 जुलै या कालावधीत अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकान खुली होणार आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 4 पर्यंत दुकान खुली करायला राज्य सरकारकडून परवानगी देण्यात आलेली आहे. परंतु विनाकारण गर्दी करु नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करावं, अशी अट राज्य शासनाने घालून दिली आहे.

पाच दिवसानंतर पुन्हा आढावा घेतला जाणार

पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढचा निर्णय घेतला जाणार आहे, असं राज्य शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसंच गर्दीचे प्रकार घडल्यास पुन्हा निर्बंध कडक करण्याचा देखील इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय.

राज्य शासनाच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना दिलासा

कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसांसाठी हटवण्याच्या निर्णयाने व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे. कारण गेल्या कित्येक दिवसांपासून कोल्हापूर शहरातील व्यापारी निर्बंधांमुळे अडचणीत सापडले होते. राज्य सरकारच्या निर्बंधांमुळे त्यांना दुकानं बंद ठेवावी लागायची. मात्र आता शासनाच्या निर्णयानंतर व्यापाऱ्यांना दिलासा म्हणावा लागेल.

ग्रामीण भागात निर्बंध कायम

कोल्हापूर शहरातील जरी निर्बंध हटवले गेले असले तरी ग्रामीण भागात मात्र निर्बंध कायम आहेत. ग्रामीण भागातील निर्बंध हटण्यासाठी जनतेला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

पालकमंत्री सतेज पाटील काय म्हणाले?

कोल्हापुरातील पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णसंख्या याबाबत प्रभारी जिल्हाधिकारी यांनी शासनाला एक पत्र पाठवलं होतं. जनभावनेचा विचार करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्री यांनी कोल्हापूर शहरातील निर्बंध पाच दिवसासाठी हटवले आहेत. शासनाने जनतेच्या हिताचा निर्णय घेतला आहे. मात्र जनतेने देखील सरकारने घालून दिलेले निर्बंध पाळायला हवेत, असं कोल्हापूर शहराचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.

आपण केलेल्या एखाद्या अनावश्यक कृतीमुळे हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांना विनाकारण त्रास सहन करावा लागू नये, याची काळजी लोकांनी घ्यावी. योग्य ती दक्षता घेऊन कोल्हापूर शहरातील व्यवहार सुरू ठेवावेत, असं आवाहन पालकमंत्री पाटील यांनी केलं.

(Restrictions in Kolhapur city lifted for five days State Government Decision Satej patil Appeal To kolhapurkar)

हे ही वाचा :

कोरोनाच्या नावाखाली लोकशाहीला कुलुप ठोकली जातेय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

‘आक्रोश’ दाबण्याचा प्रयत्न केला तरी मराठा समाज झुकणार नाही; चंद्रकांत पाटलांनी सरकारला ठणकावले

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.