“किसान सभेच्या मागण्यांबाबत सकारात्म निर्णय घेऊ”; या मंत्र्याने सरकारच्या निर्णयाची काळ-वेळ सांगितली

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 3 मे रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मंत्री समितीची बैठक आयोजीत केली असून या बैठकीला किसान सभेलाही निमंत्रित करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे.

किसान सभेच्या मागण्यांबाबत सकारात्म निर्णय घेऊ; या मंत्र्याने सरकारच्या निर्णयाची काळ-वेळ सांगितली
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 7:56 PM

अहमदनगर : किसान सभेचं लाल वादळ रस्त्यावर उतरल्यानंतर सरकारला इशारा देत मंत्र्यांच्या घरावर धडक मारणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतरही शेतकरी, महिला आणि कष्टकरी कामगार आपल्या न्याय मागण्यांसाठी ते चालत राहिले. यावेळी त्यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरावर मोर्चा जाणार असल्याचे सांगितल्यानंतर सरकारमधील तीन तीन मंत्र्यांनी चर्चेसाठी तयार होत शेतकऱ्यांच्या मागण्या निश्चित कालावधीत पूर्ण करु असं अश्वासन दिल्यानंतर किसान सभेनं मोर्चा स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले.

किसान सभेनं मोर्चा स्थगित केल्याचे जाहीर केल्यानंतर किसान सभेच्या मागण्यांबाबत विस्तारित चर्चा करून संपूर्ण प्रक्रियेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याबरोबर संपर्क होता,

त्यानंतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवून निश्चित कालावधीत ते पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सरकारच्या भूमिकेला प्रतिसाद देत किसान सभेने लाँग मार्च स्थगित केला याबद्दल त्यांनी धन्यवादही दिले आहेत.

विशेष करून वन हक्काच्या जमिनींबद्दल कार्यवाही सुरू होती मात्र पात्रतेची कार्यवाही सुरू असतानाच आदिवासींना त्या जमिनीवरून विस्थापित करण्याचं काम सुरू होतं आता त्याला आता स्थगिती दिली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत चर्चा केली असल्याचे सांगत वरकस जमीन कसणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांच्या नावावर करण्याबाबतही सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याचे सांगत त्यांनी आंदोलनकर्त्यांना अश्वास्त केले आहे.

तसेच दूध उत्पादकांना संरक्षण देण्यासाठी धोरण आखणार आहे असा शब्दही त्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. सरकार हे निर्णय घेणार असले तरी अनेक वर्षांच्या निर्णय प्रक्रियेत काही सर्वोच्च आणि काही उच्च न्यायालयाचे निर्णय असतात. त्यामुळे काही कायदे बदलले आहेत.

त्यामुळे अंमलबजावणीसाठी वेळ लागतो असंही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांची भूमिकादेखील मी नाकारत नाही तर दोन्ही बाजू योग्य असं मी मानतो असंही त्यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू घेत त्यांच्या मागण्यांचा लवकरच मान्य करून निर्णय देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी 3 मे रोजी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या मंत्री समितीची बैठक आयोजीत केली असून या बैठकीला किसान सभेलाही निमंत्रित करणार असल्याचा शब्द त्यांनी दिला आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.