“प्रत्येक घटनेला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रयत्न”; भाजपच्या मंत्र्याने मविआच्या नेत्यांची पोलखोल केली
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची त्यांनी घोषणा केली असली तरी त्यांनी सवयीप्रमाणे आपला निर्णय फिरवला आहे. त्यामुळे आता पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो अधिकार प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर राज्यातील आणि देशातील राजकारण ढवळून निघाले होते. शरद पवार आणि आपल्या लोक माझे सांगाती या आत्मकथनाच्या पुनर्प्रकाशन कार्यक्रमामध्ये राजकीय निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षासह मित्र पक्षांनाही जबर धक्का बसला. त्यानंतर राष्ट्रवादीचे काही नेते भावूक होऊन जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, विद्या चव्हाण या नेत्यांना अश्रू अनावर झाले होते. त्यानंतर त्यांच्या या घोषणेच्या सकारात्मक आणि नकारात्म प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी कायम राहणार असल्याचे जाहिर झाल्यानंतर आता पुन्हा एकदा राजकीय क्रिया प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
त्यावरून आज महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करताना त्यांच्या राजकीय घोषणा आणि निर्णयाचा संदर्भ देत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
यावेळी ते म्हणाले की, शरद पवार कधी कोणता निर्णय घेतील हे सांगात येत नाही. त्याच प्रमाणे त्यांनी आताही आपला निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीच्या घोषणेचे आणि त्यांच्या निर्णयाचे विशेष काही नसते असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.
शरद पवार यांनी आपला निर्णय आता फिरवला असला तरी त्यांनी काय निर्मणय घ्यावा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. शरद पवार यांनी भाकरी फिरली पाहिजे होती असं वक्तव्य केलं होते, त्यावरूनही त्यांनी त्यांच्या जोरदार निशाणा साधला आहे.
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची त्यांनी घोषणा केली असली तरी त्यांनी सवयीप्रमाणे आपला निर्णय फिरवला आहे. त्यामुळे आता पक्षाने काय निर्णय घ्यायचा तो अधिकार प्रत्येक पक्षाच्या अध्यक्षांना आहे असंही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवार यांच्या निर्णयावरून त्यांच्यावर टीका करताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला आहे. बारसू प्रकरणावरून ठाकरे गट आक्रमक झालेला असतानाच त्यांनी नाणार प्रकल्पाविषयी उद्धव ठाकरे यांची भूमिका काय होती असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरे यांची प्रत्येकवेळी उद्धव ठाकरे यांची भूमिका बदलत गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका ही सतत बदलत असलेली दिसून येते असा टोला लगावत प्रत्येक घटनेला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.