Chandrapur RSS : संघातर्फे चंद्रपूर शहरात पथसंचलन, कन्या शाळेतून निघाले स्वयंसेवक, घोष पथकाने पथसंचलनात चैतन्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं देशात हर घर तिरंगा अभियान सुरू केलंय. काँग्रेस नेत्यांनी संघावर निशाणा साधला. मोदींसह भाजप नेत्यांनी, सामान्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा लावला.

Chandrapur RSS : संघातर्फे चंद्रपूर शहरात पथसंचलन, कन्या शाळेतून निघाले स्वयंसेवक, घोष पथकाने पथसंचलनात चैतन्य
संघातर्फे चंद्रपूर शहरात पथसंचलन
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 10:58 PM

चंद्रपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरात पथसंचलन आयोजित करण्यात आले. शहरातील अंचलेश्वर गेट (Anchaleshwar Gate) परिसरातल्या कन्या महा शाळेत स्वयंसेवक एकत्रीकरणानंतर पथसंचलनात शिस्तबद्धरित्या सहभागी झाले. शहरातील प्रमुख मार्गांचे भ्रमण करत कस्तुरबा चौकातील (Kasturba Chowk) छत्रपती शिवरायांच्या भित्तीशिल्पापाशी पथसंचलनाचा समारोप झाला. भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त पथसंचलनाच्या आयोजनाने संघ स्वयंसेवकांनी अनोखी देशभक्ती (Patriotism) प्रदर्शित केली. चंद्रपूर नगराच्या घोष पथकाने पथसंचलनात चैतन्य आणले. पथसंचलनात शहरातील संघ स्वयंसेवक सहभागी झाले होते.

संघाच्या सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनं देशात हर घर तिरंगा अभियान सुरू केलंय. काँग्रेस नेत्यांनी संघावर निशाणा साधला. मोदींसह भाजप नेत्यांनी, सामान्यांनी सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा लावला. 12 ऑगस्टला संघाने ट्विटर, फेसबूकसह सर्व सोशल मीडिया अकाउंटवर तिरंगा लावला. कृतीतून संघाने काँग्रेसला उत्तर दिलंय.

काँग्रेसच्या टीकेला कृतीतून दिले उत्तर

संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनीही आपल्या ट्विटर अकाउंटच्या डीपीवर तिरंगा ठेवला. संघाचे सरकार्यवाह दत्तात्र होसबळे यांनीही आपला डीपी तिरंगा ठेवला. मनमोहन वैद्य यांनीही डीपी बदलविला. राहुल गांधींनी फेसबूक पोस्टद्वारे संघावर टीका केली होती. संघाने मुख्यालयावर तिरंगा का फडकविला नाही, अशी टीका केली. पंतप्रधान मोदींनी 13 ते 15 ऑगस्टदरम्यान घरावर तिरंगा लावून हर घर तिरंगा मोहीम यशस्वी करण्याचं आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला संघानंही साथ दिल्याचं दिसून आलं.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.