कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना

शासनाच्या जागेत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापूराची मदत मिळणार का ? असा प्रश्न अंकली या ठिकाणी निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या महापूराची मदत मिळाली नाही,यंदाच्या महापुरात घरे अक्षरशः उध्दवस्त झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे.

कुणी मदत देता का मदत ? अंकलीतल्या झोपडपट्टी पूरग्रस्तांची मदतीसाठी ठाकरे सरकारकडे याचना
अंकली झोपडपट्टी
Follow us
| Updated on: Aug 01, 2021 | 9:02 PM

सांगली: शासनाच्या जागेत वसलेल्या झोपडपट्टीवासीयांना महापूराची मदत मिळणार का ? असा प्रश्न अंकली या ठिकाणी निर्माण झाला आहे. गतवर्षीच्या महापूराची मदत मिळाली नाही,यंदाच्या महापुरात घरे अक्षरशः उध्दवस्त झाल्याने संसार उघड्यावर पडला आहे.मात्र, अद्याप या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही.यंदा तरी मदत मिळावी,अशी याचना येथील झोपडपट्टी धारक पूरग्रस्त टाहो फोडून ठाकरे सरकारकडे करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सांगलीतील पूरस्थितीची ते पाहणी करणार आहेत. सांगलीचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त अंकलीतील पूरग्रस्तांच्या प्रश्नाकडं लक्ष देतात का हे पाहावं लागणार आहे.

अंकली गावातील झोपडपट्टी बुडाली

सांगली शहरानजीक असणाऱ्या अंकली गावात 40 कुटुंबांची वस्ती आहे. झोपडपट्टी म्हणून त्याला ओळखले जाते. कृष्णा नदीकाठी असणाऱ्या या वस्तीमध्ये पूर आला की पाणी शिरते,यंदा चाही महापुरात अंकली गावा बरोबर गावातली ही झोपडपट्टी बुडाली.त्यामुळे झोपडपट्टीतील कुटुंबांची घरं अक्षरशा उद्ध्वस्त झाली आहेत.पुराच्या पाण्याने अक्षरश थैमान घालत हातावरचे पोट असणाऱ्या गोरगरीब कुटुंबांच्या घराची अवस्था ही होत्याची नव्हती केली आहे असं पूरग्रस्त मयुरी कांबळे यांनी सांगितलं आहे.

झोपडपट्टीची विदारक अवस्था

कोणाच्या घराच्या भिंती कोसळल्या आहेत, कुणाचे छत कोसळले आहे,त्याचं घरच कोसळला आहे,अशी विदारक परिस्थिती झोपडपट्टीवासीयांची झाली आहे. मात्र, यांना शासनाची मदत मिळेल की नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.कारण अंकली ग्रामपंचायतीकडून या झोपडपट्टी धारकांना शासनाच्या जागेवर घर असल्याने मदत मिळणार नसल्याचं सांगितले जात आहे.त्यामुळे महापुराने उध्वस्त झालेल्या या कुटुंबांचा संसार पुन्हा उभे राहणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

50 वर्षाहून अधिक काळापासून याठिकाणी या झोपडपट्टया आहेत. 2019 मधल्या महापुराच्या वेळी या ठिकाणी असणाऱ्या घरांची मोठी पडझड झाली होत.2019 मधील पुराची मदत अद्यापी मिळाली नाही,आता तरी या लोकांची घरं पूर्ण उध्वस्त झाली आहेत. शासनाकडून पडझड झालेल्या घरांच्या उभारणीसाठी मदत देण्यात येते.मात्र, इथल्या झोपडपट्टी धारकांना ती मिळणार का नाही ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे टाहो फोडून झोपडपट्टी धारकांना ठाकरे सरकारनं मदत द्यावी,अशी याचना पूरग्रस्त स्वप्नील हेगरे यांनी केली आहे.

ग्रामपंचायतीची भूमिका काय?

दरम्यान याबाबत अंकलीच्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधला असता, गावातली सरसकट सर्व पंचनामे करण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. पंचनामे होऊन सर्वांना ही मदत मिळेल आणि ते शंभर टक्के मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून शासनाच्या जागेवर अतिक्रमण असल्याने मदत न मिळण्याची शक्यता आहे,त्याबाबत उपमुख्यमंत्री ,विरोधी पक्ष नेते यांच्यासल निदर्शनास ही बाब आणून दिली असून अंकली ग्रामपंचायतीकडून 100 टक्के पंचनामे करून मदत देण्याची प्रयत्न असल्याचे ग्रामपंचायती कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

इतर बातम्या:

झिका विषाणूचा पुरंदरच्या बेलसरमध्ये राज्यातील पहिला रुग्ण, प्रशासन ॲलर्ट मोडवर, 10 टीमकडून सर्वेक्षण सुरु

राज्य सरकारचा कारभार खोट बोल पण रेटून बोल, MPSC विद्यार्थ्यांसाठी आंदोलनाचा सदाभाऊ खोत यांचा इशारा

Sangli flood update Ankli village slum area residents ask for help to Thackeray Government

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.