राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा, यांनी पटकावला भारत सर्वश्रेष्ठ किताब

या स्पर्धेसाठी अनेक राज्यातून सुमारे १५० हून अधिक शरीर सौष्ठवांनी आपली उपस्थिती लावली. मिरजेतील तिसर्‍या शरीर सौष्ठव स्पर्धेत रंगत आणली.

राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा, यांनी पटकावला भारत सर्वश्रेष्ठ किताब
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:54 AM

सांगली : सांगलीतील श्री अंबाबाईत तालिम संस्थेच्या क्रीडांगणावर अॅम्यॅच्युअर बॉडीबिल्डींग असोसिएशन, फिसिक स्पोर्टस् फेडरेशन इंडिया आणि महाराष्ट्र राज्य हौशी शरीरसौष्ठव संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली तिसरी राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा २०२२-२०२३ मोठ्या दिमाखात पार पडल्या. भव्य व्यासपीठ, पिळदार शरीर आणि भव्य लाईटच्या झगमगटात ही स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेसाठी अनेक राज्यातून सुमारे १५० हून अधिक शरीर सौष्ठवांनी आपली उपस्थिती लावून मिरजेतील तिसर्‍या शरीर सौष्ठव स्पर्धेत रंगत आणली.

sangli 2 n

नंदलाल सीताराम झा यांना किताब

तिसऱ्या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या नंदलाल सीताराम झा यांनी भारत सर्वश्रेष्ठ हा किताब पटकावला. रोख एक लाख रुपये, स्ट्रॉफी असे बक्षिसाचे स्वरूप होते. फर्स्ट टाइम विजेत्यामध्ये अजिंक्य सूर्यकांत पवार, मास्टर विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील शास्वत शंकर मानकर, सब ज्युनिअरमध्ये मध्यप्रदेशचा दक्ष हळदकर यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावला. श्री. अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष, शिवछत्रपती पुरस्कार विजेते संजय भोकरे यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

एक लाखाचे बक्षीस

या स्पर्धेत तिर्‍या भारतीय सौरवश्रेष्ठ म्हणून नंदलाल सिताराम झा (महाराष्ट्र) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आणि रोख 1 लाख रुपयांचे बक्षीस श्री अंबाबाई तालिम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्या हस्ते देण्यात आले. तत्पूर्वी या उत्तम दर्जाच्या आणि चांगल्या तसेच या स्पर्धेत पंच म्हणून सहभागी असलेल्या सर्व पंचांचा श्री. अंबाबाई तालिम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक महंमद मणेर उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये इतर कॅटेगरीमध्ये विजेते झाले

फर्स्ट टाइम विजेत्यांमध्ये अजिंक्य सूर्यकांत पवार, मास्टर विजेतामध्ये महाराष्ट्रातील शास्वत शंकर मानकर, सब ज्युनिअरमध्ये मध्य प्रदेशचा दक्ष हळदकर, ज्युनिअरमध्ये कर्नाटकाचा सुशील कुमार, सिनिअरमध्ये नंदलाल सीताराम झा, मेन्स फिजीक्यूमध्ये कर्नाटकाचा दिलीप कुमार आर आणि महिला फिजीक्यूमध्ये महाराष्ट्राची हिरा सोळंकी या विजेत्या झाल्या. या स्पर्धेत विजेत्यांना एकूण सात लाखांचे बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेचे नियोजन असोसिएशनचे पदाधिकारी श्रीकांत परब, नारायण सावंत यांनी केले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.