सांगलीत हाहाकार, पुराच्या पाण्यानं वाळवा तालुक्यात हजारो कोंबड्या मृत्यूमुखी, पोल्ट्री व्यावसायिकाचं 25 लाखांचं नुकसान

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथे पोल्ट्री मध्ये पाणी शिरले होते. यावेळी पोल्ट्री मधील तब्बल 16 हजार कोंबड्या मृत्यू मुखी पडल्या आहेत.

सांगलीत हाहाकार, पुराच्या पाण्यानं वाळवा तालुक्यात हजारो कोंबड्या मृत्यूमुखी, पोल्ट्री व्यावसायिकाचं 25 लाखांचं नुकसान
सांगलीत पोल्ट्री व्यावसायिकाचं 25 लाखांचं नुकसान
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 4:02 PM

सांगली: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथे मुल्ला यांच्या पोल्ट्रीमध्ये पाणी शिरले होते. यावेळी पोल्ट्री मधील तब्बल 16 हजार कोंबड्या मृत्यू मुखी पडल्या आहेत. त्याामुळे पोल्ट्रीचे व्यावसायिकाचे 25 लाखांचे नुकसान झाले आहे.या पुरात शेती बरोबर जनावरे आणि कोंबड्यानं ही फटका बसला आहे. शासनाने मदत करावी अशी मागणी केली जात आहे.

पोल्ट्री व्यावसायिकाचं तब्बल 25 लाखांचं नुकसान

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी गावातील शेतकऱ्याच्या शेतात पाणी शिरल्यानं पोल्ट्री व्यावसायिकाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पोल्ट्रीत पाणी शिरल्यानं तब्बल 16 हजार कोंबड्या मृत झाल्या आहेत. तर, व्यावसायिकाचं एकूण 25 लाखांचं नुकसान झालं आहे.

सांगलीत सिटी हायस्कूल रोडवर पुराचं पाणी

सांगलीत सिटी हायस्कुल रोडवर पुराचे पाणी आल्यानंतर या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यासाठी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्या टीमने तातडीने धाव घेत नागरिकांना बाहेर काढणेचे काम सुरू केले आहे. सिटी हायस्कुल ते अमरधाम स्मशान भूमीच्या रोडवरील पाण्यात जाऊन महापालिका आयुक्त कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा उपायुक्त राहुल रोकडे आणि वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, वैभव कुदळे, संदीप कोळी आदींनी मेगा फोनद्वारे या रोडवरील अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर घरात राहिलेल्या नागरिकांना तातडीने स्थलांतर करायचे आवाहन उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले. नागरिकांनीही महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत तिथून स्थलांतरित होण्यास सुरुवात केली.

सांगलीत कृष्णेची पाणी पातळी 59 फुटांवर

सांगली जिल्ह्यात गेली 4 दिवस सतत पाऊस सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. रात्री पासून सहा फूट पाणी वाढले आहे 2019 ला आलेल्या महापुरामध्ये पशुधनाचे मोठे नुकसान झाले होते. पुरापासून नागरिक गाफील राहिले होते नागरिकांनी जनावरे वेळेत बाहेर काढली नसल्याने महापुरात वाहून मारून गेली होती. या वेळी महापालिका प्रशासनाने पुराची पूर्वसूचना दिल्याने नागरिकांनी जनावरं स्वतः बाहेर सुरक्षित स्थळी हलवली आहेत.

सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्या पथकाने नागरिकांना कृष्णा घाट परिसर मोकळा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सुमारे 80 टक्के लोकांनी स्थलांतर केले आहे. मिरज अर्जुन वाड पुलाला पाणी टेकले आहे कृष्णेश्वर मंदिर पाणी शिरले आहे. सकाळी मिरज कृष्णा घाट रस्त्यावर पाणी आल्याने संपर्क तुटला होता. नागरिक कमरे इतक्या पाण्यातून बाहेर येत होते वाहने ,खाण्या पिण्याचे साहित्य तरुणांनी बैलगाडीतून बाहेर काढत होते. पाण्याची पातळी 59 फुटांवर गेली आहे पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याने पूर पट्ट्यातील नागरिकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे.

इतर बातम्या:

Weather Update Today: कोकणाला दिलासा मिळणार? राज्यात पावसाची स्थिती कशी? हवामान विभागाचा नवा अंदाज नेमका काय?

Vegetables Rate: महापुराचा भाजीपाल्याला फटका, मुंबई बाजारसमिती भाज्यांचे दर घसरले, 100 गाड्या माल पडून

(Sangli Rain Update sixteen thousand hens died due to water lodging in kameri village of sangli)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.