AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Biyani Murder : संजय बियाणींच्या आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी, मुख्य आरोपी अद्याप फरार

या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्व आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अजूनही गोळीबार करणारे मुख्य 2 आरोपी मात्र अजूनही फरार आहेत.

Sanjay Biyani Murder : संजय बियाणींच्या आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी, मुख्य आरोपी अद्याप फरार
संजय बियाणींच्या आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडीImage Credit source: टीव्ही9
| Edited By: | Updated on: Jun 11, 2022 | 1:42 AM
Share

नांदेड : नांदेडमधील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्या प्रकरणातील अटक (Arrest) झालेल्या 9 आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली आहे. संजय बियाणी यांची 5 एप्रिल रोजी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडाला तब्बल 2 महिने उलटत असताना पोलिसांनी या प्रकरणात कट रचणाऱ्या 6 आरोपींना अटक केली होती. खंडणीसाठी ही हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी आणखी 3 आरोपींना अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. सर्व आरोपींना 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अजूनही गोळीबार करणारे मुख्य 2 आरोपी मात्र अजूनही फरार आहेत.

खंडणीसाठी बियाणींची हत्या

संजय बियाणी यांच्या घरासमोरच अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात बियाणी आणि चालक गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बियाणी यांचा मृत्यू झाला. यानंतर दोन महिने अथक प्रयत्न करत पोलिसांनी या हत्याकांडाचा शोध लावला. खंडणी आणि दहशत पसरविण्यासाठी आरोपींनी हे कृत्य केल्याचे सांगितले. याप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र दोघे मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

बियाणी यांच्या घरी कौटुंबिक कलह

बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येनंतर आता बियाणी कुटुंबात कलह निर्माण झाला आहे. मयत बियाणी यांच्या पत्नीने 6 जून रोजी आपल्या दिराच्या विरोधात चोरीची तक्रार दिली आहे. फायनान्स कंपनीचा डेटा प्रवीण बियाणी यांनी चोरून नेल्याची तक्रार संजय बियाणी यांच्या पत्नीने दिली तर प्रवीण बियाणी यांच्या पत्नीने संजय बियाणी यांच्या पत्नी विरोधात जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. बियाणी कुटुंबातील हा कौटुंबिक कलह पोलीस ठाण्यात पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. (Sanjay Biyani accused remanded in police custody till June 13, main accused still absconding)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.