कोरोनाने आई-वडील मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा निर्णय
कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने घेतला आहे. (Sant Gadgebaba University Amravati )
अमरावती : कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्यात येईल, असा निर्णय संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने (Sant Gadgebaba University Amravati) घेतला आहे. या निर्णयामुळे गरीब, सामान्य कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. याअगोदर असा निर्णय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाने घेतला होता. (Sant Gadgebaba University Amravati decided to education fee waiver for students who loss parents in Corona)
संत गाडगेबाबा विद्यापीठाचा स्त्युत्य निर्णय
कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक काळाच्या पडद्याआड गेले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांसमोर शिक्षण, रोजगार, भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने त्यांचे परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2020-21 या वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफीचा लाभ मिळणार आहे.
कोरोनाचा कहर, अनेक कुटुंबातील कर्ते निघून गेले… पोरांच्या भविष्याचा प्रश्न
गतवर्षी मार्चपासून कोरोनाने कहर केला. अनेकांना या कोरोना काळात जीव गमवावा लागला. यात काही कुटुंबातील कर्ते निघून गेले… काही कुटुंबातील मुलांच्या डोक्यावरुन आई वडिलांचं छत्र हरपलं. ते उमेदीच्या वयात अनाथ झाले.
अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यांतील माहिती गोळा करणार
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत अकोला , यवतमाळ , वाशिम , बुलडाणा व अमरावती या पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोनाने आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून माहिती मागविली जाणार आहे. त्याकरिता आरोग्य यंत्रणेची मदत घेण्यात येणार आहे. आई-वडील असे दोन्ही पालक हिरावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क 100 टक्के माफ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्राचार्यांना पत्र पाठवून अशा विद्यार्थ्यांची माहिती मागविण्यात आली आहे.
कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांचं शुल्क माफ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा निर्णय
कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. अनेक जणांच्या कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचं निधन झालं आहे. कोरोनामुळे व्यक्तिगत नुकसानाबरोबर आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणावर झालं आहे. सोलापूर येथील अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनानं आई वडील गमावलेल्या विद्यार्थ्यांची महाविद्यालय आणि विद्यापीठ फी माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(Sant Gadgebaba University Amravati decided to education fee waiver for students who loss parents in Corona)
हे ही वाचा :