नरडं कापून ठेवेन एकेकाचं, साताऱ्यात भाजप नगरसेविकेची ऑडिओ क्लिप, उदयनराजे म्हणतात…

सातारा पालिकेच्या (Satara) बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार (Siddhi Pawar Satara) यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगाराला झापलं.

नरडं कापून ठेवेन एकेकाचं, साताऱ्यात भाजप नगरसेविकेची ऑडिओ क्लिप, उदयनराजे म्हणतात...
Siddhi Pawar Satara
Follow us
| Updated on: Jun 12, 2021 | 5:39 PM

सातारा : सातारा शहर प्रभागातील शिवशाही अपार्टमेंटच्या भिंतीच्या कामावरुन राडा सुरु आहे. यावरुन सातारा पालिकेच्या (Satara) बांधकाम सभापती आणि भाजप नगरसेविका सिद्धी पवार (Siddhi Pawar Satara) यांनी फोनवरून ठेकेदाराच्या कामगाराला झापलं. त्यावेळी सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही शिवीगाळ करून गळा चिरून टाकेन, अशा धमकीचीऑडिओ क्लिप साताऱ्यात चांगलीच व्हायरल झाली आहे. (Satara BJP corporator threatening audio clip viral MP Udayanraje expressed displeasure)

या क्लिपबाबत भाजप नगरसेविका आणि पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी पवार म्हणाल्या, “एक सातारकर म्हणून हा माझ्या भावनांचा उद्रेक आहे. लोकांची विकासकामे होत नसल्याने नागरिकांच्या रोषाला मला सामोरे जावे लागते. मला संताप अनावर झाला असून, लोकांच्या झालेल्या भावनाविवेशामुळे मला बोललेल्या वक्तव्याचा अजिबात खेद नाही”.

उदयनराजे नाराज 

यावर बोलताना खासदार उदयनराजे यांनी नाराजी व्यक्त केली. “प्रत्येकाने जबाबदारीने वक्तव्य केले पाहिजे. काम करत असताना अडचणी निर्माण होतात, पण समतोल बिघडता कामा नये”, असं उदयनराजे म्हणाले.

ऑडिओ क्लिप कशामुळे झाली मला माहिती नाही, पण ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मात्र अशी वक्तव्ये करणे लोकप्रतिनिधी म्हणून मला अनपेक्षित असल्याचे सांगत, पालिकेच्या चाललेल्या कारभाराबाबत, उदयनराजेंनी नाराजी व्यक्त केली.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय? 

ठेकेदार  –  हा मॅडम बोला की,

नगरसेविका : काय समजत नाही का, बुद्धीला घाण लागलीय का, काय समजत नाही काय, मी मेले नाही अजून, नरडं कापून ठेवेन एकेकाचं,

ठेकेदार – अहो काय झालं मॅडम

नगरेसेविका – शिवशाहीची कधी करुन देणार आहे भिंत?

ठेकेदार – भिंत कुठली ओ

नगरेसेविका – माहिती नाही तुम्हाला, लाजा वाटत नाहीत का तुम्हाला? त्यावेळेला एक भिंत पडली कुमारला सांगितलं होतं, बोंबलून मी.. माझ्याकडे रेकॉर्ड आहे.. विषयच काढायचा नाही कुणी कुठला.. बिप बिप बिप… दोन महिने झाले भिंत बांधून देत आहेत.. लाजा वाटत नाहीत का त्या लोकांना..

ठेकेदार – गेटची भिंत बांधली की मॅडम ती

नगरसेविका – अशी थोबाड फोडीन रंगवीनच त्याचं.. ठाकूरला

कर्मचारी – असू द्या मॅडम, शांत व्हा थोडं

नगरसेविका- आम्ही काय मूर्ख आहे काय? दोन दोन महिने तुझ्या मागं लागायला.. कोण सर आहेत जरा सांगा मला, नाव सांगा

कर्मचारी – अहो ठाकूरलाच

ठेकेदारः सरांना सांगितलं आहे, सर बोलले मटेरियल टाकून घ्या

नगरसेविकाः कोण सर आहेत तुमचे, ….च्या, त्याला हिंदीतलं कळतं, मराठीतलं कळत नाही काय?,

ठेकेदा रः दोन मिनिटं माझं ऐका

नगरसेविकाः  ये वसिम कोणाला शिकवतो तू, ठाकूरला माझ्यासमोर आणू नको, मारेन त्याला, माझ्याशी खेळायचं नाही, त्या भाड्याला एक रुपया मिळवून देत नाही, त्याची मर्डर करेन मी, गेलं….,

VIDEO : ऑडिओ क्लिप व्हायरल

संबंधित बातम्या 

संभाजीराजे माझे भाऊ, मी त्यांना भेटणार, 3 ते 4 दिवसात भेट होईल : उदयनराजे भोसले

(Satara BJP corporator threatening audio clip viral MP Udayanraje expressed displeasure)

महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला
मुंडेंच्या भेटीनंतर दादा-फडणवीसांमध्ये बैठक, राजीनाम्याचा दबाव वाढला.
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
आता माझ्या भावना मेल्यात, नाराज असलेले छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?.
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर
आधी पैसे देणाऱ्यांवरच कारवाई करा, बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर.
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
राजीनाम्यावरुन दबाव? मुंडे दादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?.
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...
मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्....
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.