रत्नागिरीमधील शाळा पुन्हा सुरु होण्याचा मुहूर्त ठरला! 3 हजारपेक्षा अधिक शाळा पुन्हा कधीपासून गजबजणार? वाचा
Ratnagiri Corona : रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे. 6 जानेवारी रोजी रत्नागिरीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा (Schools in Ratnagiri District) अखेर पुन्हा सुरु होणार आहेत. 1 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा शाळा सुरु केल्या जाणार आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील शाळा या बंद करण्यात आला होता. पुन्हा एकदा ऑफलाईन वर्ग बंद करुन ऑनलाईनच शिक्षण (Online Education) विद्यार्थ्यांचं सुरु झालं होतं. वाढत्या ओमिक्रॉनच्या रुग्णवाढीचा फटका राज्यातील शाळांना बसला होता. अखेर पुन्हा एकदा आता ओमिक्रॉनचा संसर्ग नियंत्रणात येत असल्यानं राज्याच्या वेगवेगळ्या भागातील शाळा पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येतो आहे. अशातच रत्नागिरीतीलही शाळा आता येत्या महिन्यापासून पुन्हा एकदा गजबजणार आहेत. रुग्णवाढ हळूहळू कमी झाली असल्यानं आणि कोरोना संसर्ग (Corona) नियंत्रणात येत असल्यानं आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णवाढ नियंत्रणात
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला हिरवा कंदील दिला आहे. 6 जानेवारी रोजी रत्नागिरीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा शाळा सुरु करण्यात येणार आहेत. गेल्या 24 तासांत रत्नागिरीतील रुग्णवाढीही संख्याही घटली असल्याचं दिसून आलं. रत्नागिरीकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली असून कोरोना रुग्ण संख्येत घट झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 200च्या पार येत होती, तीच आता दीडशेच्या आत आली आहे. गेल्या 24 तासात 103 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचं समोर आलंय.
..आणि शाळा गजबजल्या!
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत आणि मोठ्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नववी ते बारावीच्या वर्ग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर इतर क्षेत्रातील पहिली ते बारावी पर्यंत वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनाच्या निवासी आश्रम शाळा वगळून कोरोनाचे नियम पाळत आजपासून सुरु करण्यास परवानगी दिल्याने जिल्ह्यातील शाळा पुन्हा एकदा गजबजल्यात. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णसंख्येची वाढ आता पुन्हा एकदा नियंत्रणात येत असल्याचं दिसून आल्यानं पुन्हा एकदा वेगवेगळ्या जिल्ह्यातील शाळा या सुरु करण्याचा निर्णय घेतला जातो आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.
इतर बातम्या :
12 आमदारांचं निलबंन रद्द करताना सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलं? आशीष शेलारांनी सांगितलं!
‘ही तर सरकारला मिळालेली सणसणीत चपराक!’ 12 आमदारांचं निलंबन रद्द होताच दरेकरांचा घणाघात