सेजल पाटील आंतरराष्ट्रीय व्यासपीठासाठी सज्ज; सांगलीतील सेजलचे आता सुपर मॉडेल हे लक्ष्य

या स्पर्धेसाठी भारतातून 6000 मुलींनी अर्ज केला होता. ऑनलाईन आणि फिजिकल ऑडिशनमधून पहिले 75 स्पर्धक निवडले गेले.

सेजल पाटील आंतरराष्ट्रीय व्यासपीठासाठी सज्ज; सांगलीतील सेजलचे आता सुपर मॉडेल हे लक्ष्य
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 2:56 PM

सांगली : राष्ट्रीय स्तरावर द इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या सीजन दोन मिस्टीम इंडिया 2023 मध्ये सांगलीच्या सेजल पाटील हिने सहभाग घेत मिस्टीम इंडिया 2023 चा किताब पटकावला. याचा ग्रँड फिनाले मुंबई येथे पार पडला. या फिनालेमध्ये सेजल पाटील यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यामध्ये सेजलने पहिले स्थान मिळवत प्रतिष्ठित असणाऱ्या मिस्टीन इंटरनॅशनल वर्ल्ड इंडिया 2023 चे विजेतेपद पटकावले. प्रसिद्ध अभिनेत्री मनीषा लांबा आणि मिस मैथिली भोसेकर यांच्या हस्ते सेजलला मिस्टर इंडिया 2023 चा मुकुट प्रदान करण्यात आला. याचबरोबर तिला सुंदर ट्रॉफी आणि सॅश देऊनसुद्धा सन्मानित करण्यात आले. या यशानंतर सेजल आता भारताचे प्रतिनिधित्व आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करण्यासाठी सज्ज झाली आहे.

इंटरनॅशनल गेमर प्रोजेक्टमध्ये भारत आणि अमेरिका युती आहे. जी पेंजाट्रीच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण इको सिस्टम तयार करण्यावर विश्वास ठेवते. या अंतर्गत टीनेज मुलींसाठी इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टने राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे टॅलेंट सिद्ध करण्यासाठी मोठा प्लॅटफॉर्म दिलेला आहे.

सहा हजार मुलींनी केला होता अर्ज

या स्पर्धेसाठी भारतातून 6000 मुलींनी अर्ज केला होता. ऑनलाईन आणि फिजिकल ऑडिशनमधून पहिले 75 स्पर्धक निवडले गेले. त्यातून कठीण प्रक्रियेतून ग्रँड फिनालेसाठी 31 स्पर्धक निवडले गेले होते. अंतिम आठ स्पर्धांमधून प्रश्नोत्तराच्या राऊंडमधून सेजलने आपल्या उत्तराने सर्वच ज्युरी पॅनलचा मन जिंकलं आणि मुकुटावर सेजलने नाव कोरले.

वर्षभर चाललेले या स्पर्धेसाठी सेजल मुकुटपूर्व फेरीत आणि सोशल मीडिया फेरी, चॅलेंज फेरी, वैयक्तिक फेरी, मुलाखत फेरी, परिचय फिटनेस तसेच रेड कार्पेट फेरी व राऊंड प्रेस मीडिया कॉन्फरन्स आणि थीम राऊंड तसेच रॅम्पवॉक प्रश्नोत्तर यासारख्या मूल्यांकनामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली.

२५ मेंटर्सनी दिले प्रशिक्षण

याचबरोबर मिस टीन इंटरनॅशनल वर्ल्ड इंडिया 2023 या शीर्षकासहित माईंड बॉडी सोल हा किताबसुद्धा तिने जिंकला. मुख्य मार्गदर्शक आणि इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्टच्या डॉक्टर अक्षता प्रभू आणि आयरमॅन डॉक्टर स्वरूप पुराणिक यांनी प्रशिक्षण दिले. तसेच 25 ऑनलाईन नॅशनल इंटरनॅशनल मेंटनर्सनी सुद्धा सेजलला प्रशिक्षण दिले आहे.

SEjal patil 2 n

नाट्य, नृत्यात मिळवले बक्षीसं

सेजलने वयाच्या सहाव्या वर्षापासून फॅशन विकसाठी रॅम्पवॉक करत आली आहे. इंडिया किड्स फॅशन पिकमध्ये सुद्धा तिने दोनदा रॅम्पवॉक केलेला आहे. मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा छोटी भूमिका तिने साकारली आहे. शालेय स्तरावर नाट्य आणि नृत्यांमध्ये अनेक बक्षीस मिळवलेले आहेत. सेजलला इंग्रजी मराठी हिंदी कन्नड या चार भाषा येतात. शेजारी प्रतीक्षित कथक नृत्यांगणसुद्धा आहे.

सेजल आता तिच्या महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करत आहे. तिच्या मनात भविष्याची स्वप्न आहेत. तिला सुपर मॉडेल व्हायचे आहे. तिच्या मताप्रमाणे आजची तरुणाई फॅशन इंडस्ट्रीकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सेजल समाज कार्यावर लक्ष केंद्रित करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नेतृत्व करून आंतरराष्ट्रीय सुपर मॉडेल बनण्याचं लक्ष्य सेजलच्या समोर आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.