धक्कादायक! इचलकरंजीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 61 वर्षीय नराधमावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा

हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले दर्गा चौक परीसरात नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. पिडीत मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने आपल्या नवीन बांधकामावरील पञ्याच्या शेडमध्ये मुलीला नेले आणि तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे.

धक्कादायक! इचलकरंजीत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 61 वर्षीय नराधमावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा
CRIME
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 6:51 PM

इचलकरंजी : अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित करणारी आणि सर्वांना हादरवून टाकणारी आणखी एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली आहे. हातकणंगले येथे एका 61 वर्षिय नराधमाने अल्पवयीन मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार केला. त्यात ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी नंदकुमार चंद्रकांत निगवे याच्याविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याच्या हातात बेड्या ठोकल्या आहेत.

बलात्कार पीडित मुलीने दिला स्त्री अर्भकाला जन्म

हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले दर्गा चौक परीसरात नंदकुमार चंद्रकांत निगवे राहतो. पिडीत मुलीच्या इच्छेविरुद्ध त्याने आपल्या नवीन बांधकामावरील पञ्याच्या शेडमध्ये मुलीला नेले आणि तिथे तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार आता उघडकीस आला आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर आरोपी नंदकुमारच्या गैरकृत्याचा पर्दाफाश झाला आहे. पीडीत मुलीवर सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. ती गर्भवती होती. त्यातून तिने स्ञी अर्भकाला जन्म दिला. त्यानंतर नातेवाईकांनी सांगली जिल्ह्यातील संजयनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ती तक्रार हातकणंगले पोलीस ठाण्याकडे नुकतीच वर्ग करण्यात आली आहे.

न्यायालयाने सुनावली पाच दिवसांची कोठडी

हातकणंगले पोलीसांनी या घटनेचा कसून तपास करीत आरोपी नराधम नंदकुमार निगवे याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कोठडीतील चौकशीदरम्यान त्याच्या अन्य काळ्या कृत्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्याच्यावर कठोर कलमांतर्गत गुन्हे दाखल करून या प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी केली जावी, अशी मागणी आता हातकणंगले परिसरातून आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांकडून केली जात आहे.

खाजगी सावकारीतून अनेक अन्याय

नंदकुमार निगवे याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे. याच पैशांच्या जोरावर त्याने गैरकृत्य चालू ठेवले होते. त्याने खाजगी सावकारीतून अनेक अन्याय केल्याचे उघडकीस आले आहेत. त्याच्यावर हातकणंगले पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्याच्या अशा गैरवर्तणुकीचा समाजाला धोका असल्याचे ग्रामस्थांनी वारंवार पोलीस यंत्रणेच्या निदर्शनास आणून दिलेले आहे. याआधी संतप्त ग्रामस्थांनी त्याची धिंडही काढली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तणुकीत सुधारणा झालेली नाही. त्यामुळे आता त्याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्याची मागणी जोर धरत आहे. (Sexual abuse of a minor girl by an elderly man in Ichalkaranji)

इतर बातम्या

16 कृषी अधिकाऱ्यांच्या घोटाळ्याला नवे वळण; विभाग म्हणतो, प्रकरण निकाली, पण तक्रारदाराला माहितच नाही

Nashik Crime|बाप नव्हे, माणुसकीला डसलेला साप; पोटच्या गोळ्याला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.