VIDEO: ‘मुलगी डॉक्टर, तिला प्रॅक्टिस करु द्या’, लग्नात आशिर्वाद देताना राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला शरद पवारांची सूचना

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाच्या लग्नाला भेट देताना मुलगी डॉक्टर असल्याचं समजताच नवरदेवाला मुलीला वैद्यकीय प्रॅक्टिस करु देण्याची सूचना केली.

VIDEO: 'मुलगी डॉक्टर, तिला प्रॅक्टिस करु द्या', लग्नात आशिर्वाद देताना राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाला शरद पवारांची सूचना
Follow us
| Updated on: Jun 26, 2021 | 11:58 PM

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरून ठिकठिकाणी भेटी देत असल्याचं दिसत आहे. शुक्रवारी (25 जूनला) पुण्यातील पक्ष कार्यालयाला भेट दिल्यानंतर ते आज (26 जून) सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वेळापूर येथे पोहचले. या ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. विशेष म्हणजे त्यांनी केवळ भेटच दिली नाही, तर नवरदेव नवरीची विचारपूसही केली. मुलगी डॉक्टर असल्याचं समजताच त्यांनी नवरदेवाला मुलीला वैद्यकीय प्रॅक्टिस करु देण्याची सूचनाही केली (Sharad Pawar visit marriage of NCP leader Uttam Jankar son in Malshiras Solapur).

राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांचे सुपुत्र जीवन जानकर आणि जत येथील सुभाष माने पाटील यांची कन्या स्नेहल यांच्या विवाह निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे वेळापुरात आले होते. यावेळी त्यांनी वधू-वरास शुभेच्छा दिल्या. यावेळी उत्तम जानकर यांनी मुलगी डॉक्टर असल्याची माहिती दिली. त्यावर शरद पवारांनी मुलीला प्रॅक्टिस करणार ना असा प्रश्न उपस्थित केला. तसेच उत्तम जानकर यांच्या मुलाला मुलीला प्रॅक्टिस करु देण्याची सूचना दिली. यावर नवरदेव जीवन जानकर याने आपला व्यवसाय असल्याची माहिती शरद पवार यांना दिली.

उत्तम जानकर हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे मोठे नेते आहे. त्यांनी माळशिरस मतदारसंघातून 2019 साठी राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवली होती. त्यावेळी भाजप आमदार राम सातपुते यांच्या कडून निसटता पराभव झाला होता.

हेही वाचा :

‘पुण्याच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात येण्याआधी मी काळजीत होतो’, गर्दीवरुन शरद पवारांची टोलेबाजी

कामाची गती पाहता आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल, शरद पवारांकडून क्रीडा विभागाचं कौतुक

संजय राऊत मातोश्रीवर, मुख्यमंत्र्यांना भेटताय का? राऊत म्हणाले शिवसेना पक्षप्रमुखांना भेटतोय!

व्हिडीओ पाहा :

Sharad Pawar visit marriage of NCP leader Uttam Jankar son in Malshiras Solapur

मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.