ज्ञानगंगा अभयारण्यात हवेत 3 फायर; 40 ते 45 मेंढपाळांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला

ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वनपरिक्षेत्रात गस्तीवर असलेल्या वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांवर 40 ते 45 मेंढपाळांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना मंगळवारी (10 ऑगस्ट) दुपारी खामगाव वनपरिक्षेत्रात असलेल्या पिंपळगाव नाथ परिसरात घडली.

ज्ञानगंगा अभयारण्यात हवेत 3 फायर; 40 ते 45 मेंढपाळांचा वन कर्मचाऱ्यांवर हल्ला
Follow us
| Updated on: Aug 11, 2021 | 5:33 PM

बुलडाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील खामगाव वनपरिक्षेत्रात गस्तीवर असलेल्या वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांवर 40 ते 45 मेंढपाळांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. ही घटना मंगळवारी (10 ऑगस्ट) दुपारी खामगाव वनपरिक्षेत्रात असलेल्या पिंपळगाव नाथ परिसरात घडली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी आपल्या बंदुकीतून हवेत 3 फायर केल्याने मेंढपाळ घटनास्थळावरून पसार झाले आणि कर्मचाऱ्यांचा जीव वाचला.

बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात गुरे चरण्यास मनाई आहे. मात्र, मनाई असतानाही या ठिकाणी अनेक मेंढपाळ आपल्या मेंढ्या चरण्यास आणतात. या भागात पावसाळ्यात हिरवळ असल्याने चरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. 10 ऑगस्टला दुपारी अशीच माहिती गस्तीवरील कर्मचाऱ्यांना मिळाली.

“वनकर्मचाऱ्यांवर लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला”

यानंतर हे कर्मचारी पिंपळगाव नाथ भागात असलेल्या मेंढपाळांकडे गेले आणि त्यांना हटकले. त्यावेळी त्यांनी वनकर्मचाऱ्यांवर लाठ्या काठ्यांनी प्राणघातक हल्ला केला. यावेळी खामगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी सुरुवातीला आपल्या बंदुकीतून हवेत एक गोळी फायर केली.

40 ते 45 मेंढपाळांनी वनकर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप

गोळीबार केल्यानंतर त्याठिकाणी असलेले 10 ते 12 मेंढपाळ पळून गेले. मात्र, थोड्यावेळाने मेंढपाळांनी आपल्या इतर साथीदारांना बोलावले. यावेळी 40 ते 45 मेंढपाळांनी वनकर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

मेंढपाळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल

मेंढपाळांकडे लाठ्या काठ्या आणि शस्त्रे असल्याने वनकर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका होऊ शकतो म्हणून उपस्थिती वनपरिक्षेत्र अधिकारी दीपेश लोखंडे यांनी आपल्या बंदुकीतून दोन वेळा हवेत फायर केले. त्यामुळे हल्ला करणारे मेंढपाळ घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, वनाधिकाऱ्यांनी या मेंढपाळ हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा :

आधी कोरोनाचा मार, आता यवतमाळमध्ये ‘या’ रोगांचा पिकांवर हल्ला, शेतकरी हवालदील

ट्रॅव्हल्स कंपनीच्या दोघा कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, डोक्यात फरशी टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न

मलंगगडला टवाळखोरांची तरुण-तरुणींना मारहाण, तीन अल्पवयीन मुलांसह पाच जण ताब्यात

व्हिडीओ पाहा :

Shepherd attack on forest officer in buldhana

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.