शिवसेनेतील ‘हा’ आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

Shivsena MLA Chimanrao Patil | 2014 च्या विधानसभेत आपला पराभव घडवून आणण्यात आला, असे चिमणराव पाटील म्हणतात. त्याचे खंडन करणे गरजेचे असून वृद्धापकाळामुळे चिमणरावांचे मानसिक संतुलनही अधिकच बिघडले आहे.

शिवसेनेतील 'हा' आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा
चिमणराव पाटलांचा एक पाय भाजपमध्ये
Follow us
| Updated on: Jul 05, 2021 | 8:29 AM

जळगाव: मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, अशी खंत व्यक्त करुन दाखवणारे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील (Chimanrao Patil) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून गंभीर आरोप करण्यात आला आहे. चिमणराव पाटील यांचा एक पाय सध्या शिवसेनेत व एक पाय भाजपमध्ये असल्याचा दावा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार सतिश पाटील यांनी केला. तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे काम राष्ट्रवादीला आक्षेपार्ह वाटत नसताना त्यांच्याच पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांना ते का आक्षेपार्ह वाटते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (NCP leader Satish Patil gave statement over Shivsena leader Gulabrao Patil and Chimanrao Patil issue)

सतिश पाटील रविवारी जळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार मनीष जैन, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, प्रदेश प्रवक्ता योगेश देसले, कार्याध्यक्ष विलास पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, महिला शहराध्यक्षा मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ आदी उपस्थित होते.

यावेळी सतिश पाटील यांनी चिमणराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला. 2014 च्या विधानसभेत आपला पराभव घडवून आणण्यात आला, असे चिमणराव पाटील म्हणतात. त्याचे खंडन करणे गरजेचे असून वृद्धापकाळामुळे चिमणरावांचे मानसिक संतुलनही अधिकच बिघडले आहे. राष्ट्रवादीत कार्यकर्ते मोठे करण्याची मानसिकता आहे. मात्र, शिवसेनेत वेगळे चित्र दिसतेय. जिल्हा परिषदेतील सदस्य डॉ. हर्षल माने यांची शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर तुमची झोप का उडाली?, असा सवाल सतिश पाटील यांनी चिमणराव पाटलांना विचारला.

राज्यात महाविकास आघाडी असल्याने शासकीय समित्या नियुक्तीत तिन्ही पक्षांना स्थान द्यावे असे आदेश आहेत. परंतु, आमदार चिमणराव पाटील एरंडोल, पारोळा मतदार संघात हा नियम पाळत नाहीत. त्यांच्यामुळेच आपण काम करण्यास हतबल झालोय, अशी व्यथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती, असेही सतिश पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

गुलाबराव पाटील मला वडिलांसारखे, रक्षा खडसेंचं वक्तव्य, लेकीनेही बापाने केलेल्या कामाची जाण ठेवावी, पाटलांचं प्रत्युत्तर!

मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, शिवसेनेच्या आमदाराचा मंत्र्यावर गंभीर आरोप

(NCP leader Satish Patil gave statement over Shivsena leader Gulabrao Patil and Chimanrao Patil issue)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.