जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे! बैठकीसाठी खडसे-महाजन आले एकत्र

बैठकीला माजी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे एकत्र येतात की नाही? याबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सायंकाळी या बैठकीला हे दोन्ही नेते एकत्र आले. हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले. मात्र, त्यांच्यात संवाद झाला नाही.

जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे! बैठकीसाठी खडसे-महाजन आले एकत्र
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 11:48 PM

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने आज (सोमवारी) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत बँकेची निवडणूक चारही पक्षांच्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. पुढच्या एक-दोन बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढाही सुटेल, असा विश्वास नेत्यांनी वर्तवला आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य असलेली कोअर कमिटी गठीत झाली आहे. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन हे एकत्र आले होते. (Signs of Jalgaon District Bank election being uncontested, Khadse and Mahajan came together for the meeting)

राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

बैठकीला माजी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे एकत्र येतात की नाही? याबाबत दिवसभर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सायंकाळी या बैठकीला हे दोन्ही नेते एकत्र आले. हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले. मात्र, त्यांच्यात संवाद झाला नाही. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील या नेत्यांनी एकमेकांची नावे घेणे टाळले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापू लागले आहे.

आज (सोमवारी) झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत ही निवडणूक चारही पक्षांच्या सर्वपक्षीय पॅनलच्या माध्यमातून एकत्र लढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढच्या एक-दोन बैठकांमध्ये जागा वाटपाचा तिढाही सुटेल, असा विश्वास नेत्यांनी वर्तवला. दरम्यान, या निवडणुकीच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी चारही पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य असलेली कोअर कमिटी गठीत झाली आहे. या बैठकीसाठी एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे व भाजप नेते गिरीश महाजन हे एकत्र आले होते.

एकमेकांच्या शेजारी बसले, पण संवाद नाही

या बैठकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन व एकनाथ खडसे एकत्र येतात की नाही? याबाबत दिवसभर राजकीय वतुर्ळात जोरदार चर्चा सुरू होती. मात्र, सायंकाळी या बैठकीला हे दोन्ही नेते एकत्र आले. हे दोन्ही नेते एकमेकांच्या शेजारी बसले. मात्र, त्यांच्यात संवाद झाला नाही. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देखील या नेत्यांनी एकमेकांची नावे घेणे टाळले.

अध्यक्ष-उपाध्यक्षपदाबाबतही चर्चा

गिरीश महाजन यांनी जागा वाटपासह अध्यक्ष-उपाध्यक्ष पद देखील वाटून घेण्याचे मत मांडले. यावर सव्वा-सव्वा वर्ष हे पद देण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली. तसेच याबाबत ठाम निर्णय कोअर कमिटीच्या पुढील बैठकीत घेण्याचे ठरले. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी यापुढे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर अ‍ॅड. रोहिणी खडसे व स्वत: इच्छुक नसल्याचे स्पष्ट केले. विकास सोसायटी मतदार संघातील विद्यमान संचालक कायम ठेवण्याबाबत देखील चर्चा झाली. मात्र, यामध्ये जागावाटप समान करून घेण्याबाबत चर्चा झाली. बैठकीतील चर्चेवरून तरी जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन राजकीय पक्षांमध्ये दुमत नसल्याचे सध्या तरी चित्र दिसत आहे. आता कोअर कमिटीच्या बैठकीत या राजकीय पक्षांची काय भूमिका राहतेय, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. (Signs of Jalgaon District Bank election being uncontested, Khadse and Mahajan came together for the meeting)

इतर बातम्या

Video | क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नर बनला रजिनकांत, केला ऐश्वर्या रायसोबत धमाकेदार डान्स

तब्बल 141 वर्षांची अखंडित परंपरा, नागपूर मारबतसाठी सज्ज, आता सरकारच्या कोरोना गाईडलाईन्सची प्रतीक्षा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.