Parali Morcha : नांदेडमधील संजय बियाणी हत्या प्रकरण, आरोपींच्या अटकेसाठी माहेश्वरी समाजाचा मूक मोर्चा

छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मूकमोर्चा काढण्यात आला होता. तेथून मोर्चा मौलाना अबुल कलाम आझाद चौक, सिंचन भवन मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. परळीत काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने माहेश्वरी बांधव आणि व्यापारी सहभागी झाले होते.

Parali Morcha : नांदेडमधील संजय बियाणी हत्या प्रकरण, आरोपींच्या अटकेसाठी माहेश्वरी समाजाचा मूक मोर्चा
संजय बियाणी हत्या प्रकरणातील दुचाकीच्या मालकाला अटकImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 06, 2022 | 5:37 PM

परळी : नांदेडमधील प्रसिद्ध व्यावसायिक संजय बियाणी (Sanjay Biyani) यांच्या हत्येचे तीव्र पडसाद परळीत उमटले आहेत. आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी यासाठी परळीत सकल माहेश्वरी समाजाच्या वतीने भव्य मूकमोर्चा (Morcha) काढण्यात आला होता. बियाणी यांच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांना कडक शासन करावे अशा आशयाचे निवेदन शासनाला तहसिल कार्यालयाच्या मार्फत देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून हा मूकमोर्चा काढण्यात आला होता. तेथून मोर्चा मौलाना अबुल कलाम आझाद चौक, सिंचन भवन मार्गे तहसील कार्यालयावर नेण्यात आला. परळीत काढण्यात आलेल्या मोर्चात हजारोंच्या संख्येने माहेश्वरी बांधव आणि व्यापारी सहभागी झाले होते. (Silent March of Maheshwari Samaj for arrest of accused in Sanjay Biyani murder case in Nanded)

अमरावतीतही राजस्थानी समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

नांदेडमध्ये मंगळवारी व्यावसायिक संजय बियाणी या बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने नांदेड हादरले आहे. तर या घटनेनंतर अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद उमटले आहेत. राज्यस्थानी हितकारक मंडल, माहेश्वरी समाज व मारवाडी समाजाचे वतीने नांदेडच्या घटनेच्या निषेधार्थ अमरावतीच्या इर्विन चौकातून दुचाकी रॅली काढत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बीजवल यांना निवेदन देण्यात आले. या हत्येत आरोपी असलेल्यांना तातडीने अटक करा व फास्टट्रक कोर्टात प्रकरण चालवा. तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी ही मागणी यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली. यावेळी नांदेडच्या घटनेचा जोरदार निषेध करण्यात आला.

व्यावसायिक संजय बियाणींची मंगळवारी गोळ्या घालून हत्या

नांदेड शहरातील बाधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची मंगळवारी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शहरातील शारदानगर येथील घराबाहेर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन आरोपींनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. खंडणीसाठी किंवा व्यावसायिक स्पर्धेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्याच दृष्टीने तपास सुरू आहे. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. (Silent March of Maheshwari Samaj for arrest of accused in Sanjay Biyani murder case in Nanded)

इतर बातम्या

नातीवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला आजीने पाठवले 25 वर्षे तुरुंगात; पोक्सो कोर्टाने दिला तीन महिन्यांत निकाल

Pune crime : उधारीचे पैसे मागितले म्हणून कुऱ्हाडीनं सपासप वार केले, हडपसरमध्ये सराईतास बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.