सिंधुदुर्गसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जिल्हा बँकेच्या अध्यक्षाची निवड; नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी

महाराष्ट्रभर चर्चा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा आज आणखी टप्पा पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (SDCC) जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार आहे.

सिंधुदुर्गसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, जिल्हा बँकेच्या अध्यक्षाची निवड; नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 6:58 AM

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रभर चर्चा झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा आज आणखी टप्पा पार पडणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक (SDCC) जिल्हा बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज पार पडणार आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) जिल्हा बँकेत उपस्थित राहून नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा सन्मान करतील, अशी शक्यता असल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकपूर्व जामिनासासंदर्भातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. ही सुनावणी ऑनलाईन पार पडणार असून यामध्ये नेमकं काय घडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळं ही सुनावणी ऑनलाईन होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीची प्रक्रिया कशी असणार?

आज 9:30 वाजता ओरोस येथील जिल्हा बँकेत अध्यक्ष,उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 10 वाजता नामनिर्देशन दाखल होईल आणि त्यानंतर अर्जाची छाननी झाल्यावर दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान होईल. मतदानानंतर एक ते दोन वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता आहे. त्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष कार्यभार स्वीकारतील.

नारायण राणे नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांच्या अभिनंदनासाठी येणार?

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जिल्हा बँकेत नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांच्या अभिनंदनासाठी जिल्हा बँकेत येण्याची शक्यता आहे, अशी माहिती आहे.

नितेश राणे यांच्या अर्जावर सुनावणी

भाजप आमदार नितेश राणेंच्या संतोष परब मारहाण प्रकरणी अटकपूर्व जामीनावर मुंबई हायकोर्टात दुपारी 1:00 वाजता सुनावणी होणार आहे. आमदार नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई हे कुडाळ मधून ऑनलाईन युक्तिवाद करतील, अशी माहिती देखील मिळाली आहे.

भाजप 11 तर महाविकास आघाडी 8 जागांवर विजयी

संतोष परब हल्ला प्रकरण आणि नितेश राणे यांच्या अटकेची शक्यता, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जिल्हा बँक ताब्यात ठेवण्यास मिळवलेलं यश यामुळं ही निवडणूक राज्यभर चर्चेत होती. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी असली तरी ती राणे कुटुंब विरुद्ध शिवसेना अशीच होती. जिल्हा बँकेत भाजपला हरवणं म्हणजे राणेंच्या वर्चस्वला धक्का लावणं असं समीकरण होतं. त्यामुळे शिवसेना त्वेषाने या निवडणुकीत उतरली होती. पण तरीही राणेंनी 11 जागा जिंकत बँकेवर आपलंच वर्चस्व कायम असल्याचं दाखवून दिलं. तर महाविकास आघाडीने 8 जागा जिंकून मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यात यश मिळवलं.

इतर बातम्या:

चलनी नोटा कोरोनाच्या ‘सुपर स्प्रेडर’? ‘कॅट’चे केंद्राला पत्र, वाचा- आरोग्य मंत्रालयाचे उत्तर!

Video : फाळणीनं तोडलं… नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे

Sindhudurg District Bank Election Chairman Election and Nitesh Rane bail application hearing in Bombay High Court

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.