रवी राणा हे बच्चू कडूंबाबत खोटं बोलत असतील तर.., सुषमा अंधारे यांनी काय केलं पाहिजे ते सांगितलं
राज्यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर बोलणं गरजेचं आहे.
नांदेड : आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा या दोघांनाही सागर बंगल्यावर बोलावण्यात आलं आहे. त्यांची समोरासमोर चर्चा होणार असल्याचं कळतं. हा वाद मिटेल का, यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या गटनेच्या सुषमा अंधारे म्हणाल्या, तो त्यांचा लूकआऊट आहे. त्यांच्याकडं काय चाललं हे मी कसं सांगू शकते. पण, एक नक्की आहे. रवी राणा खोटं बोलत असतील, तर रवी राणानं केलेल्या सगळ्या आक्रस्ताळे विधानांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दंडीत केलं पाहिजे.
पण, रवी राणा खरं बोलत असतील तर मात्र कठीण आहे. या देशातील संसदीय लोकशाहीतील चौकटचं विस्कळून जात आहे. ते क्लीअरकट सांगत आहेत की, खोके घेऊन जाणाऱ्यांपैकी मी नाही.
लोकांमध्ये तुमची खोकेवाली सरकार अशी प्रतिमा झाली आहे. ही प्रतिमा कदाचित खरी आहे. मग,हे सगळे खोके घेऊन जाणारे लोकं आहेत का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खोके कोणी दिले.
अधिवेशन काळात अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महाशक्तीच्या कृपेशिवाय हे शक्य नव्हतं. आम्ही रात्री मी आणि देवेंद्रजी वेष बदलून भेटत होतो.
खोके देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत गेले की, अजून कोणाच्या मार्फत गेले. याचंसुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे. कारण खोक्यांमधून गेलेले पैसे हे महाराष्ट्राच्या घामातून गेलेले पैसे आहेत.
राज्यात जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर बोलणं गरजेचं आहे. मुळात हिंदुत्व कशाची खातात हेच भाजपला माहीत नाही. भाजपचं राजकारण हे कायमचं द्वेषमुलक राजकारण राहिलं आहे.
भाजप जाती-धर्मामध्ये राजकारण करू पाहते. त्याला छेद देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कटिबद्ध असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या.