…म्हणून तानाजी सावंत यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवला असावा; खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं

कुणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत येत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. प्रत्येकाच्या दिशा ठरलेल्या आहेत. कुणी आमच्या खांद्यावर हात ठेवला म्हणून संभ्रम ठेवण्याचं कारण नाही.

...म्हणून तानाजी सावंत यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवला असावा; खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सांगितलं
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 9:36 AM

उस्मानाबाद : येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मुख्य कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पुढाकार घेत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना जवळ केले. त्या दोघांच्या खांद्यावर हात टाकत हात उंचावून घोषणा दिल्या. शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन शिवसेनेत 2 गट पडल्यानंतर मंत्री सावंत व खासदार ओमराजे आणि आमदार पाटील यांच्यात दुरावा आणि अबोला होता. तो आज काही अंशी दूर झाला. गेल्या आठवड्यात भाजप आमदार राणा पाटील यांनी मंत्री सावंत यांची तक्रार केल्यानंतर दोघात दरी पडली होती. त्यातच राणा यांचे विरोधक खासदार ओमराजे यांच्यासोबत सावंत यांनी जवळीक वाढवली का, अशा चर्चा सुरू झाल्या.

भाजपचे गुण लक्षात आले असावेत

यासंदर्भात बोलताना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले, शिंदे गटाला भाजपचे गुण लक्षात आले असावेत. त्यामुळे तानाजी सावंत यांनी आमच्या खांद्यावर हात ठेवावासा वाटला असेल, असं मला वाटते. शिवजयंतीचा कार्यक्रम होता. त्याठिकाणी सर्वजण गेलो होतो. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करायचे असल्याने आपण टोकाचे मतभेद बाजूला ठेवतो.

भाजपच्या आमदारांनी तानाजी सावंत यांची तक्रार केली. त्या घटनेचा संदर्भ आजच्या घटनेशी असू शकतो, असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हंटलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय लोकांना बोलावलं गेलं होतं. शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो होतो.

आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच

ओमराजे निंबाळकर म्हणाले, २००९ साली उद्धव ठाकरे यांनी मला महाराष्ट्राच्या विधानसभेत नेलं. २०१९ ला देशाच्या लोकसभेत नेलं. त्यामुळं आम्ही त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची प्रतारणा करणार नाही. अतिशय खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत. संकटाच्या वेळी आपल्या पाठीशी उभं राहणाऱ्याच्या पाठीशी उभं आमची शिकवण आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत उभे आहोत.

तसे आम्हाला उद्धव ठाकरे दिसतात

कुणी उद्धव ठाकरे यांच्यासोबत येत असतील, तर त्यांचे स्वागत आहे. प्रत्येकाच्या दिशा ठरलेल्या आहेत. कुणी आमच्या खांद्यावर हात ठेवला म्हणून संभ्रम ठेवण्याचं कारण नाही. अर्जुनाला माशाचा डोळा दिसत होता. तसं आम्हाला उद्धव ठाकरे दिसतात, असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलं.

कुणल्याही संकटाच्या काळात आम्ही ठाकरे यांच्यासोबत उभे आहोत. धनुष्यबाण गोठवलं गेलं. शिवसेना हे पक्षाचं नावही गेलं. पण, तरीही आम्ही ठाकरे यांच्यासोबतचं राहणार, असंही निंबाळकर यांनी स्पष्ट केलं. धनुष्यबाण कुणाला पेलवणार हे आपल्या लक्षात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार कैलास पाटील यांची प्रतिक्रिया

कोणत्याही प्रलोभनाला किंवा दहशतीला भिक न घातला पडत्या पावसात, अंधाऱ्या रात्री परतलो तो काय पक्ष सोडण्यासाठी ? असा प्रतिप्रश्न केला. मंत्री सावंतानी खांद्यावर हात का ठेवला ? त्याच्या मागचा हेतू काय? ते त्यांनाच माहीत पण तेवढ्या काळापुरता खांद्यावर हात टाकला म्हणून वेगळ्या चर्चा घडत असतील तर ठाकरे परिवाराने मला आजची ओळख दिलेली आहे. योगायोगाने झालेली काही क्षणांची भेट आमच राजकीय भविष्य बदलू शकत नाही. आमचं राजकीय जीवन ठाकरे कुटुंबासाठी समर्पित आहे. अशा संभ्रमाच्या राजकारणाला मी महत्व देत नाही. आमचा विरोधक हा राजकीय आहे. त्यांना उत्तरही आम्ही राजकीय कार्यक्रमात देऊ असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.