आईप्रमाणे सांभाळणाऱ्या सासूला अखेरचा निरोप, चार सुनांचा पार्थिवाला खांदा

सासूबाईंचे निधन झाल्यावर सूनबाईंनी खांदा देत परंपरेला छेद दिला आहे. समाजाला दिशा देणारी असं या घटनेचं वर्णन करावं लागेल. (Solapur Barshi Old Lady last Rites by her Daughter in Law)

आईप्रमाणे सांभाळणाऱ्या सासूला अखेरचा निरोप, चार सुनांचा पार्थिवाला खांदा
सासूबाईंचे निधन झाल्यावर सूनबाईंनी खांदा देत परंपरेला छेद दिला आहे. समाजाला दिशा देणारी असं या घटनेचं वर्णन करावं लागेल.
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 1:45 PM

सोलापूर : सासू -सूनांमधले वाद आपल्यासाठी नवे नाहीत. दिवसागणिक अश्या अनेक घटना आपण पाहतो ऐकतो, मात्र याला मात्र बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील मुंढे कुटुंब अपवाद म्हणावे लागेल… मायेच्या एका धाग्यात ओवलेल्या मुंढे कुंटुबांची माळ असलेल्या सासूबाईंचे निधन झाल्यावर सूनबाईंनी खांदा देत परंपरेला छेद दिला आहे. समाजाला दिशा देणारी असं या घटनेचं वर्णन करावं लागेल. (Solapur Barshi Old Lady last Rites by her Daughter in Law)

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील दमयंती कारभारी मुंडे यांचे वयाच्या ७० व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. अध्यात्माची साथसंगत असलेल्या दमयंती यांनी आयुष्यात देवधर्मासोबतच तत्व आणि मुल्यांचही पालन केलं.

जिवंतपणी सासूचा शब्द कधी खाली पडू दिला नाही

त्यांनी आपल्या चारही सुना अनिता यशवंत मुंढे, वैशाली जयवंत मुंढे, अर्चना गुणवंत मुंढे आणि मनोरमा बळवंत मुंढे यांना कायम मुलींप्रेमाणे प्रेम अन् माया दिली. या सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही की, शब्दाने कधी दुखावले नाही.

मेल्यावरही वृद्ध सासूच्या पार्थिवाला सूनांचा खांदा

वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दमयंती यांना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आणि जेव्हाच्या तेव्हा अगदी मागण्या अगोदर हजर लागायचती… चारही सुनांनी सासू बाईंची अगदी आईप्रमाणे सेवा केली… त्यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंबालाच धक्का बसला.

अंत्ययात्रा निघाली त्यावेळी प्रेताला खांदा देण्यासाठी सुना पुढे आल्या. दमयंती यांचे भाऊ चंद्रकांत, हरिश्‍चंद्र आणि संभाजी तर मुले यशवंत,जयवंत, गुणवंत, बळवंत यांनी देखील खांदा दिला. दमयंती यांचे पती कारभारी मुंडे हे स्वतः शिक्षक होते. त्यामुळे त्यांनी या बदलास संमती दिली.

(Solapur Barshi Old Lady last Rites by her Daughter in Law)

हे ही वाचा :

नांदायला नकार देणाऱ्या पत्नीचे लांबसडक केस पतीने कापले, पिंपरीमध्ये विकृतीचा कळस

शेती करताना अडचण आलीय, एका फोनवर सोल्यूशन, कृषी वैज्ञानिक प्रॉब्लेम सोडवणार

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.