रुग्णांना मदत करण्यात अपयश आलं, तर रात्र रात्र झोप येत नाही : आमदार निलेश लंके

कोरोना थैमान घालत आहे, त्यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच लोकांसाठी मदत कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील एका आमदाराची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदाराचं नाव आहे निलेश लंके.

रुग्णांना मदत करण्यात अपयश आलं, तर रात्र रात्र झोप येत नाही : आमदार निलेश लंके
Follow us
| Updated on: May 10, 2021 | 11:50 PM

अहमदनगर : कोरोना थैमान घालत आहे, त्यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. अशातच लोकांसाठी मदत कार्य करणाऱ्या महाराष्ट्रातील एका आमदाराची जोरदार चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या आमदाराचं नाव आहे निलेश लंके. इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो, हेच या पारनेरच्या आमदारानं दाखवून दिलंय. निलेश लंके यांनी त्यांच्याकडे कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना 1100 बेडचं कोविड सेंटर उभारलंय. मग काय लंके यांचं काम बघून परदेशी नागरिकांनाही त्याची भुरळ पडलीय. लंके यांना एक नव्हे तर 5 देशातून आर्थिक मदत मिळाली. यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट (Special report on how Parner NCP MLA Nilesh Lanke work for Covid patient corona treatment).

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खिशात एक रुपयाही नसताना, कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना तब्बल 1100 बेडचे कोविड सेंटर उभारण्याची किमया केलीये. सर्वसामान्य कुटूंबात जन्म घेतलेले निलेश लंके हे लोकवर्गणीतून आमदार झाले. त्यांच्यात लहानपणापासूनच समाजसेवेची आवड, इतरांना नेहमी मदत करण्याची वृत्ती आहे. हे सर्व काम करत असताना ते ग्रामपंचायतमध्ये सरपंच झाले आणि थेट आमदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली. मात्र, हे शक्य झालं त्यांच्या इच्छाशक्तीमुळे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत 5000, तर दुसऱ्या लाटेत आतापर्यंत 2500 रुग्णांवर मोफत उपचार

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर काही महिन्यात कोरोनाच्या महामारीने आपल्या देशात थैमान घातलं. मात्र सुरुवातीला कोणीच पुढे येऊन काम करत नव्हतं तेव्हा आमदार लंके यांनी 1 हजार बेडचं कोविड सेंटर उभारलं. पहिल्या लाटेत 5 हजाराहून अधिक लोकांनी मोफत उपचार घेऊन सुखरुप घरी परतले तर आता दुसर्‍या लाटेत 14 एप्रिलपासून सुरू केलेल्या कोविड सेंटरमध्ये 2 हजार 500 लोक उपचार घेऊन घरी परतले. निस्वार्थीपणाने काम केलं, तर हजारो हात देणारे असतात असं मत त्यांनी व्यक्त केलं. लोकांनी भरभरून या कोविड सेंटरला मदत दिलीये. आतापर्यंत या कोविड सेंटरला तब्बल 1 कोटी 20 लाख रुपयांची मदत झाल्याची माहिती लंके यांनी दिलीय.

कोविड सेंटरला फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिसमधून आर्थिक मदत

या कोविड सेंटरमध्ये रुग्ण दाखल होण्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत सर्व देखभाल करण्यात येते. रुग्णांसाठी औषधांसोबत पौष्टिक आहार देखील दिला जातो. या कोविड सेंटरला फ्रान्स, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दुबई, पॅरिस या देशांमधून लोकांनी आर्थिक मदत केलीये. तर या सेंटर उभारण्यासाठी अरुण भुजबळ यांनी आपले मंगल कार्यालयात मोफत दिलेय, अशी माहिती लंके यांनी दिलीय.

“स्वतःचा मुलगा देखील इतकी सेवा करू शकत नाही इतकी सेवा निलेश लंके करतात”

लंके यांचं काम पाहून अनेक रुग्णांच्या डोळ्यात अश्रू येतात. स्वतःचा मुलगा देखील इतकी सेवा करू शकत नाही इतकी सेवा निलेश लंके करत असल्याचं हे रुग्ण सांगतात. निलेश लंके हे आमची दिवसरात्र काळजी घेतात, अशी भावना काही महिलांनी व्यक्त केलीय. लंके यांचा आदर्श इतरांनी घेतला तर गोर गरिबांचे हाल थांबतील. लवकरच आपला देश या महामारीतू मुक्त होईल.

हेही वाचा :

ना डोक्याखाली उशी, ना अंगावर चादर, तरीही शांतपणे झोप; कोरोनाग्रस्तांना मदत करणाऱ्या आमदाराचा ‘हा’ फोटो पाहाच

“माझं काय व्हायचं ते होऊ द्या, मी घाबरून घरात बसलो तर या लोकांनी कोणाच्या दारात बसायचं”

“मी वाचाळवीर नाही, तर शब्दाचा पक्का”, आमदार लंकेंनी ग्रामपंचायत निवडणुकीतील शब्द पाळला

व्हिडीओ पाहा :

Special report on how Parner NCP MLA Nilesh Lanke work for Covid patient corona treatment

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.