Akola Rain | अकोल्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, केळी बागेचे मोठं नुकसान, वर्धेतही बरसल्या पावसाच्या सरी
तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तेल्हारा तालुक्यातील दानापूरला पावसाने झोडपलंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्यात पहिल्याच पावसात केळी बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. 100 ते 120 हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान झालं.
अकोला : जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील पणज परिसरात केळीची लागवड करण्यात आली. बोचरा, रुईखेड या भागात मोठ्या प्रमाणावर केळी लागवड केली आहे. हा परिसर बागायती आहे. या भागात मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावली. मोठ्या प्रमाणात थैमान घातले. त्यामुळं केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, गुरुवारी संध्याकाळी पावसासोबत झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे केळीबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage) झाले. सर्वे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी (Farmers) करत आहेत.
तेल्हारा तालुक्यातही केळी पडल्या आडव्या
अकोला जिल्हातल्या तेल्हारा तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. तेल्हारा तालुक्यातील दानापूरला पावसाने झोडपलंय. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागा जमीनदोस्त झाल्यात पहिल्याच पावसात केळी बागायतदारांचं मोठं नुकसान झालंय. 100 ते 120 हेक्टरवरील केळी बागांचं नुकसान झालं. प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.
उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा
वर्धा शहरात काल दुपारदरम्यान पावसाच्या सरी बरसल्या. 15 ते 20 मिनिट आलेल्या पावसामुळे उकाड्याने त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून वर्धेच तापमान हा 45 अंशांच्या घरात आहे. सकाळपासूनच नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. शेतकरी बांधवानी सुद्धा खरीपची तयारी पूर्ण केली आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. काल आलेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
जोरदार पावसाची प्रतीक्षा
विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. पण, उन्ह अद्याप पाहिजे तशी कमी झालेली नाही. आकाश ढगाळलेल्या स्थितीत आहे. पाऊस पडतो की, काय असं वाटतं. लोकं पावसाची आतूरतेनं वाट पाहत आहेत. गोंदियात काल वादळी वाऱ्यासह सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जोरदार हजेरी लावली. आलेल्या या पावसाने गोंदियाकरांना उकाड्यापासून थोडा दिलासा मिळाला. अखेर मृग बरसल्याने शेतकरी सुखावला. शेतकरी खरिपातील धूळपेरणीच्या कामाला लागणार आहे. मात्र आणखी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.