नक्षल चळवळीला मोठा धक्का, शहीद सप्ताहापूर्वी दोन जहाल नक्षलवादी… 

चिन्ना बोडकेल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. यावेळी पोलीस दलाचे 2 जवान शहीद आणि 5 जवान जखमी झाले होते.

नक्षल चळवळीला मोठा धक्का, शहीद सप्ताहापूर्वी दोन जहाल नक्षलवादी... 
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 6:57 PM
व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली : 8 लाख रुपये इनाम असलेल्या 2 जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांना आत्मसमर्पण केलं. महाराष्ट्र शासनाने अडमा जोगा मडावी याच्यावर 6 लाख रुपयांचे, तर टुगे कारु वड्डे याच्यावर 2 लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. अडमा जोगा मडावी (वय २६ वर्षे) यांच्यावर ६ लाख रुपये बक्षीस होते. तो छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यातील जिलोरगडाचा रहिवासी होता. टुगे कारु वड्डे (वय 35 वर्षे) हा बिजापूर जिल्ह्यातील कवंडेचा रहिवासी होता. या दोघांनी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्यासमोर आत्मसमर्पण केले.

अडमा मडावी

हा जुलै 2014 ला पामेड एलजीएसमध्ये सदस्य पदावर भरती झाला. तो 2021 पर्यंत कार्यरत होता. जानेवारी 2021 ला झोन अॅक्शन टीममध्ये बदली झाली. जून 2023 ला दलम सोडून घरी परत आला. अडमाचा ८ चकमकीत सहभाग होता. त्याने पाच खून केले आहेत. 2016 मध्ये बोटेतोंग जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. तसेच 2017 मध्ये बुरकापाल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. यावेळी सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले होते. तसेच चिन्ना बोडकेल जंगल परिसरातील चकमकीमध्ये तो सहभागी होता. यावेळी पोलीस दलाचे 2 जवान शहीद आणि 5 जवान जखमी झाले होते.

टुगे कारु वड्डे

हा 2012 ला जाटपूर दलम जनमिलीशीय सदस्य पदावर भरती झाला. 2023 पर्यंत कार्यरत राहून घरी परत आला होता. त्याच्याविरोधात ६ खुनांचे गुन्हे दाखल आहेत. 2022 मध्ये ईरपनार येथील रोड कामावरील 12 वाहनांची जाळपोळ करण्यात त्याचा सहभाग होता.

दोघांनाही पुनर्वसनासाठी बक्षीस

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून अडमा जोगा मडावी यास एकूण 4 लाख 50 हजार रुपये बक्षीस जाहीर केले. आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडून टुगे कारु वड्डे याला एकूण 4 लाख रुपये बक्षीस जाहीर केले.

नक्षली का करतात आत्मसमर्पण?

शासनाने आत्मसमर्पण योजना जाहीर केली आहे. वर्षभरात विविध चकमकीत माओवांद्यांच्या झालेल्या खात्म्यामुळे काही नक्षलवादी आत्मसमर्पण करतात.  तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दल पुनर्वसन घडवून आणते. त्यामुळेही माओवादी मोठ्या संख्येने आत्मसमर्पण करतात.

नक्षली सप्ताह

 28 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान नक्षलवादी नक्षल शहीद सप्ताह पाळतात. नक्षली सप्ताहामध्ये नक्षलवादी सरकारी मालमत्तेचे नुकसान करतात. सुरक्षा दलांवर हल्ले करतात. खबरी असल्याच्या संशयावरुन निष्पापांच्या हत्या करतात. रस्ते बंद करणे, बंद पुकारणे, धमकावणे, जनतेकडून पैसा वसूल करणे अशी कामे करतात. ठेकेदाराकडून खंडणी गोळा करणे अशा हिंसक कारवाया करतात.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.