Bandatatya Karadkar: पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे निर्व्यसनी, सदाचारी; बंडातात्या कराडकर यांना उपरती

भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या दारु पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान करणं बंडातात्या कराडकर यांना चांगलंच भोवलं आहे. बंडातात्या कराडकर यांच्या या विधानाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत.

Bandatatya Karadkar: पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे निर्व्यसनी, सदाचारी; बंडातात्या कराडकर यांना उपरती
पंकजा मुंडे, सुप्रिया सुळे निर्व्यसनी, सदाचारी; बंडातात्या कराडकर यांना उपरती
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 2:03 PM

सातारा: भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) या दारु पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान करणं बंडातात्या कराडकर यांना चांगलंच भोवलं आहे. बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या या विधानाचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी बंडातात्या कराडकर यांचे पुतळे जाळले जात आहेत. तर काही ठिकाणी निदर्शने (protest against Bandatatya Karadkar) केली जात आहेत. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात बंडातात्या कराडकर यांच्या विरोधात वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे बंडातात्यांना अखेर माघार घ्यावी लागली आहे. बंडातात्यांनी आपल्या विधानावर पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांची माफी मागितली आहे. पंकजा मुंडे आणि सुप्रियाताई या निर्व्यसनी आहेत. सदाचारी आहेत, असं बंडातात्यांनी सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

बंडातात्या कराडकर यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. सुप्रियाताई आणि पंकजाताई यांच्याबद्दल मी आकसाने बोललो नाही. मी केवळ समाजातील ऐकीव माहितीवर ते विधान केलं होतं. माझं पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्याशी माझं बोलणं झालं नाही. त्यांना भेटून मी दिलगीरी व्यक्त करणार आहे. पंकजा आणि सुप्रियाताई यांचं वर्तन चुकीचं नाही. त्या सदाचारी आहेत. या दोन्ही नेत्या निर्व्यसनी आहेत, असं बंडातात्यांनी सांगितलं.

माफी मागताना कमीपणा वाटत नाही

सुप्रिया सुळे आणि मी अनेकवेळेला अनेक कार्यक्रमात एकत्र आलो आहे. आमचा एकमेकांशी संवादही झालेला आहे. मी त्यांना ताई म्हणतो. पंकजा यांना मी कधीच भेटलो नाही. पण त्यांचे वडील गोपीनाथ मुंडे यांचं आणि माझं प्रेमाचं नातं होतं. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मी आमच्या वयात दहा-बारा वर्षाचा फरक असला तरी मी सुप्रियाताईंना मी कन्येच्या ठिकाणी मानतो. पंकजा यांनाही कन्येच्या ठिकाणी मानतो. त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला असेल तरी या दोन्ही माझ्या मुली समजून बाप या नात्याने मी क्षमा मागत आहे. त्याबद्दल मला कोणताही कमीपणा वाटत नाही. त्याचबरोबर मी त्यांना विनंती करेल की तुमच्या अनुयायांच्या भावनांचा उद्रेक होऊ नये याची त्यांनी दक्षता घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली.

कधीच वाकडा पाय पडला नाही

राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझं अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढलंच आहे, असंही त्यांनी सांगितलं. माझ्या 70 वर्षाच्या जीवनात माझा कुठेच वाकडा पाय पडला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

भूमिका चूक आहे असं वाटत नाही

राज्य सरकारने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. माझ्या या विधानावर मी ठाम आहे. समाजाविरोधातील हा निर्णय आहे. महिला, मुलं आणि इतरांसाठी हा निर्णय चुकीचा आहे. धार्मिक निर्णयाच्या अनुषंगाने मी बोललो होतो. वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून बोलतो. धार्मिक निर्णय लादले जातात, त्यावर मी भूमिका घेतली आहे ती चूक आहे असं मला वाटत नाही, असं त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

बंडातात्या कराडकर यांच्या मठात पोलीस!! सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी सुरु

Video: पतंगराव कदमांचा एक पोरगा कशानं गेला माहितय का? बंडातात्या कराडकरांनी मर्यादा ओलांडली?

VIDEO: अजितदादानं गुण लावला दारू विकण्याचा, बंडातात्या कराडकरांच्या टार्गेटवर नेत्यांचे पोरंबाळही

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.