चोर आला रे आला, चोरीच्या संशयाने घात केला, मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन जखमी

ते चोरीच्या उद्देशाने गावात आले असल्याचा ग्रामस्थांना संशय आला. या संशयावरून गावातील जमावाने तिघांना बेदम मारहाण केली.

चोर आला रे आला, चोरीच्या संशयाने घात केला, मारहाणीत एकाचा मृत्यू, दोन जखमी
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 5:18 PM

नजीर खान, प्रतिनिधी, परभणी : मध्यरात्री गावात चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याच्या संशयावरून तिघांना गावातील जमावाकडून जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला. तर दोघे जखमी झाल्याची घटना परभणीच्या उखळद येथे घडली. जमावाकडून तिघांना मारहाण करताना व्हिडीओही तयार करण्यात आला. घटनेनंतर जिल्ह्याभरात एकच खळबळ माजली आहे.

परभणी तालु्क्यातील उखळद या गावातून शनिवारी पहाटे तीन ते चारच्या सुमारास 3 युवक दुचाकीवर जात होते. ते चोरीच्या उद्देशाने गावात आले असल्याचा ग्रामस्थांना संशय आला. या संशयावरून गावातील जमावाने तिघांना बेदम मारहाण केली. मारहाण केल्यानंतर ग्रामस्थांकडून पोलिसांना 112 नंबरवर बकरी चोर पकडण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

हे सुद्धा वाचा

एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पोलिसांनी घटनास्थळ गाठत तिघांना ताब्यात घेतले. तिघांपैकी एकाला अस्वस्थ वाटत असल्याने पोलिसांनी त्याला रुग्णालयात भरती केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मारहाणीत जखमी झालेल्या गोरासिंग गुरुबच्चन सिंग दुधानी याने ताडकळस पोलिसांना दिलेल्या तक्रारी वरून 8 अनोळखी तसेच इतरांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाळीव डुक्कर शोधण्यासाठी गेल्याची माहिती

व्हिडीओच्या माध्यमातून आणखीन आरोपी निष्पन्न करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांनी दिली. जखमींकडून पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास पाळीव डुक्कर शोधण्यासाठी तिघे उखळद या ठिकाणी गेले होते. गावातील काही जणांना ते तिघे चोरी करण्यासाठी आले असल्याचा संशय आला. त्यामुळे उखळद गावातून नवागडकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर गावातील काही लोकांनी संबंधितांना जबर मारहाण केली.

हे दोघे झाले जखमी

चोर समजून त्यांना बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले. त्यात उपचारादरम्यान किरपालसिंग सुरजित सिंग भौंड यांचा मृत्यू झाला, तर अरुणसिंग जोगीदसिंग टाक, गोरासिंग उर्फ सचिनसिंग गुरुबच्चनसिंग दुधाणी हे दोघे जखमी झाले. त्यांच्यावर परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचार सुरू आहे.

दरम्यान, चोरीच्या संशयावरून बुधवारी मुंबईतही अशाच प्रकारची घटना घडली आहे. चोर समजून जमावाने एका तरुणाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता.

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.