AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Osmanabad Firing : उस्मानाबादमधील सरपंचावरील हल्ला प्रकरण, पवनचक्की टेंडरवरुन गोळीबार झाल्याचा बिक्कड यांचा दावा

नितीन बिक्कड यांच्या गाडीवर शनिवारी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचेवर मध्यभागी लागली. सुदैवाने या हल्ल्यात बिक्कड सुखरुप बचावले आहेत. पारा -फक्राबाद रोडवर बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला.

Osmanabad Firing : उस्मानाबादमधील सरपंचावरील हल्ला प्रकरण, पवनचक्की टेंडरवरुन गोळीबार झाल्याचा बिक्कड यांचा दावा
उस्मानाबादमधील सरपंचावरील हल्ला टेंडरच्या वादातूनImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 19, 2022 | 11:13 PM
Share

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष तथा वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड (Nitin Bikkad) यांच्यावर झालेल्या गोळीबार (Firing) प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. गोळीबाराचा हा प्रकार दिल्ली येथील रेन्यू सूर्या रोशनी कंपनीच्या पवनचक्की टेंडर (Tender)वरून झाला असल्याचा पुरवणी जबाब बिक्कड यांनी दिला आहे. कंपनीचे के राजा कुमार व कंपनीचा वेंडर कुलदीप देशमुख यांनी घडवून आणला असावा, असा संशय बिक्कड यांनी जबाबात व्यक्त केला आहे. या पवनचक्की कंपनीचे काम उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक भागात सुरु असून त्यांना मोठा राजकीय वरदहस्त आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.

पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून तपासाची चक्रे झपाट्याने फिरवण्यास सुरवात केली आहेत. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह सहाय्यक पोलीस एम रमेश यांच्यासह पोलीस निरीक्षक सुरेश दळवे, पोलीस उप निरीक्षक पवन निंबाळकर यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी तपास करीत आहेत. या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन भेटी दिल्या आहेत.

बिक्कड यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या

नितीन बिक्कड यांच्या गाडीवर शनिवारी अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला होता. बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचेवर मध्यभागी लागली. सुदैवाने या हल्ल्यात बिक्कड सुखरुप बचावले आहेत. पारा -फक्राबाद रोडवर बिक्कड त्यांच्या गावी जात असताना हा गोळीबार झाला. गुन्हा नोंद करण्याची कारवाई वाशी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु होती. (The attack on the sarpanch in Osmanabad was claimed through a tender)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.