Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणेंना अटक होणार?

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केले होते.

Nitesh Rane : संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणेंना अटक होणार?
नितेश राणे, आमदार
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 10:32 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर कणकवलीत झालेल्या मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेच्या कारवाईची टांगती तलवार आहे. पोलिसांनी नितेश राणेंना चौकशी करता पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी 21 डिसेंबरला नोटीस बजावली होती. त्यानुसार नितीश राणेंची शनिवारी अर्धा तास चौकशी झाली. या चौकशीनंतर आता त्यांना अटक होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांचे पती गोट्या सावंत यांचीही कणकवली पोलिसांनी चौकशी केली आहे.

18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी टोकदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सरकारकडून मला गोवण्याचा प्रयत्न: नितेश राणे

संतोष परब हल्ला प्रकरणात राजकीय वर्तुळात जोरदार आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. नितेश राणे यांनी त्यांची चौकशी सुरू करण्यामागे महाविकास आघाडी सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपप्रणित पॅनेलचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत. सर्व उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाजपला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित होण्याची आशा आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते मला नाहक शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे. ज्या दिशेने पोलीस चौकशी करत आहे, त्यावरून मला गोवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे स्पष्ट होते. गेल्या 2 वर्षांपासून राज्यात विरोधी पक्षनेत्यांवर खोट्या केसेस टाकून त्यांना गुंतविण्याचा प्रयत्न मविआकडून सुरु आहे. असाच अनुभव मला येत आहे, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटले आहे.

नितेश राणेंवरील कारवाईसाठी शिवसेना आंदोलन करेल : वैभव नाईक

संतोष परब हल्ला प्रकरणाला जबाबदार असलेल्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. परंतु मुख्य सुत्रधारापर्यंत पोलीस पोचत नाहीत. नितेश राणे व गोट्या सावंत यांचे स्टेटमेंट घेऊन त्यांना सोडण्यात आले. पोलिसांनी न घाबरता कारवाई केली पाहिजे. नितेश राणे आमदार आहे म्हणून किंवा केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून जर पोलीस कारवाई करायचे थांबत असतील तर शिवसेना आंदोलन करेल. शिवसेना उद्या कणकवली पोलीस स्थानकात जाऊन सुत्रधारांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी सांगितले. (The attention of political circles is on whether Nitesh Rane will be arrested)

इतर बातम्या

मोठी बातमी! समीर मेघेंसह अधिवेशनातील 32 जणांना कोरोनाची लागण, 32 जणांमध्ये कुणाकुणाचा समावेश?

‘मी नाराज नाही, शिवसेनेतच राहणार, जाणीवपूर्वक बदनाम केलं जातंय,’ पक्षांतराच्या चर्चेनंतर तानाजी सावंत यांचे स्पष्टीकरण

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.