Osmanabad : पुरात वाहून गेलेल्या तरुणाचा तब्बल 6 महिन्यांनी कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या लोकांनी झाडावर लटकलेला सांगाडा पाहिला व नंतर त्याच्या कुटुंबाला कळवले नंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी ढोकी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. सांगाडा हा झाडावर अर्धवट लटकलेला दिसत आहे.
उस्मानाबाद : उस्मानाबाद येथे सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरा (Flood)त वाहून गेलेल्या एका तरुणाचा मृतदेह (Deadbody) तब्बल 6 महिन्यांनी सापडला आहे. बालाजी कांबळे असे या तरुणाचे नाव असून तो उस्मानाबाद तालुक्यातील इर्ला गावचा रहिवासी आहे. बालाजी कांबळे हा 27 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तेरणा नदी ओलांडत असताना पुरात वाहून गेला होता. नदीला पूर आला होता. त्यामुळे बालाजी यास पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत वाहून गेला होता. त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा शोध लागला नव्हता. त्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी त्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. (The body of a young man who was swept away by floods in Osmanabad was found six months later)
दरम्यान नदीत मासे पकडण्यासाठी गेलेल्या लोकांनी झाडावर लटकलेला सांगाडा पाहिला व नंतर त्याच्या कुटुंबाला कळवले नंतर नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली. यावेळी ढोकी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. सांगाडा हा झाडावर अर्धवट लटकलेला दिसत आहे. कुजलेल्या अवस्थेत हे शरीराचे अवयव दिसत आहेत.
अतिवृष्टीमुळे तेरणा नदीत दुथडी भरुन वाहत होती
उस्मानाबाद जिल्ह्यात तेर ढोकी या भागात ढगफुटी झाल्याने नदी नाल्यांसह तेरणा नदीला पूर आला होता. मुसळधार पावसामुळे तेरणा धरण फुल्ल झाल्याने सर्व दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता. यामुळे तेर या गावासह तेरणा नदी काठी असलेल्या इर्ला दाऊतपूर येथे पाणी गावात शिरले होते. मांजरा आणि तेरणा पात्रालगतच्या सर्व गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला होता.
उस्मानाबाद तालुक्यातील रामवाडी येथील अंदाजे 125 लोक, इर्ला येथील अंदाजे 114 लोक, तेर येथील अंदाजे 35 लोक, दाऊतपूर येथील अंदाजे 90 लोक, बोरखेडा येथीलअंदाजे 35 लोक, कामेगाव येथील अंदाजे 40 व्यक्तींना आणि वाकडीवाडी येथील 20 जणांसह अशाप्रकारे एकूण 439 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. जिल्ह्यात उस्मानाबाद तालुक्यातील सहा, तुळजापूर तालुक्यातील दोन, कळंब तालुक्यातील तीन तर उमरगा तालुक्यातील एका मंडळात अतिवृष्टी झाली होती. (The body of a young man who was swept away by floods in Osmanabad was found six months later)
इतर बातम्या
Roha Suicide : रोह्यात आरोपीची पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये गळफास घेऊन आत्महत्या
Pune Crime : कात्रज दरीत आढळला जळालेल्या अवस्थेतला तरुणाचा मृतदेह