Chandrapur Tiger Death | 40 बछड्यांचा बाप गेला, ताडोबात होता दरारा; सिन्हाळा जंगलात सापडला मृतदेह

वाघडोह हा एकेकाळी ताडोबाची शान होता. त्याच्यापासून सुमारे 40 छाव्यांचा जन्म झाला असावा. पण, गेल्या काही दिवसांपासून म्हातारा झाल्यानं त्यानं आपला भाग बदलविला होता. सक्षम वाघांनी त्याला हाकलून लावले असावे. गेली काही दिवस तो सिन्हाळाच्या जंगलात वास्तव्यास होता.

Chandrapur Tiger Death | 40 बछड्यांचा बाप गेला, ताडोबात होता दरारा; सिन्हाळा जंगलात सापडला मृतदेह
ताडोबातील जगप्रसिध्द वाघडोह वाघाचा मृत्यू झालाImage Credit source: t v 9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 2:04 PM

चंद्रपूर : ताडोबातील जगप्रसिध्द वाघडोह वाघाचा मृत्यू झाला. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा (Sinhala) गावाशेजारी असलेल्या जंगलात आज सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला. अंदाजे 17 वर्षे वय असलेल्या या वाघाचा ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दीर्घ काळ दरारा होता. ताडोबाच्या मोहर्ली, वाघडोह हा वाघ त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या जखमेच्या खुणेमुळे (scare face) या नावानंदेखील ओळखलं जात होतं. वाघडोह हा वाघ बिग डॅडी ऑफ ताडोबा (big daddy of tadoba) म्हणून देखील प्रसिद्ध होता. वाघडोह हा ताडोबातील किमान 40 पिल्लांचा बाप होता. म्हातारा आणि अशक्त झाल्यामुळे वाघडोह ला तीन वर्षे आधी इतर वाघांनी ताडोबातून हुसकावून लावले होते. तेव्हापासून त्याचा चंद्रपूर शहराजवळील जंगलात वावर होता.

बिग डॅडी ऑफ ताडोबा

वाघडोह हा एकेकाळी ताडोबाची शान होता. त्याच्यापासून सुमारे 40 बछड्यांचा जन्म झाला असावा. पण, गेल्या काही दिवसांपासून म्हातारा झाल्यानं त्यानं आपला भाग बदलविला होता. सक्षम वाघांनी त्याला हाकलून लावले असावे. गेली काही दिवस तो सिन्हाळाच्या जंगलात वास्तव्यास होता. याला बिग डॅडी ऑफ ताडोबा असंही म्हणत. कारण त्याची खूप मोठी वंशावळ ताडोबात असल्याचं सांगितलं जातं.

वाघडोह होता धोकादायक

चंद्रपूर शहराजवळ असलेल्या सिन्हाळा येथील ग्रामस्थाचा दोन दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. दशरथ पेंदोर (65) असं हल्ल्यात मृत्यू झालेल्या ग्रामस्थाचं नाव आहे. बकऱ्या चारण्यासाठी गावतलावाशेजारी गेलेले दशरथ हे परत आले नव्हते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शोधाशोध केली. याच परिसरात दशरथ यांचा छिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाघडोह या ताडोबातील प्रसिध्द वाघाचा वावर आहे. अतिशय म्हातारा आणि अशक्त असलेला वाघडोह माणसं आणि पाळीव जनावरांसाठी धोकादायक ठरू शकतो ही शक्यता लक्षात होती.

हे सुद्धा वाचा

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.