खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या

बाळकृष्ण करबटे हे शनिवारी गावात फिरत असताना आरोपींनी त्यांना जंगलाच्या दिशेने नेत त्यांची हत्या केली. त्यानंतर करबटे यांच्या गळ्यातली सोन्याची चैन, हातातल्या अंगठ्या चोरुन नेल्या.

खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
खेडमधील हत्येचे गूढ उकलले; सोन्याच्या दागिन्यांसाठी केली वृद्धाची हत्या
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 8:22 PM

खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात नदीपात्राजवळ सापडलेल्या व्यक्तीची तुटलेली बोटे आणि मांसाचे गूढ उकलण्यास पोलिसांना यश आले आहे. खेडमधील सुसेरी गावात सोन्याच्या दागिन्यांसाठी 64 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या प्रकरणाचा छडा लावत, या प्रकरणी गावातील चार तरुणांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. बाळकृष्ण भागोजी करबटे (वय 65) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. स्वयम शशिकांत शिंदे (21) अजय विजय शिंदे (24), राजेश पांडुरंग पाणकर (37), निलेश पन्दिरांग पाणकर (34) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. (The mystery of the murder in Khed was solved; Murdered for gold jewelry)

बाळकृष्ण करबटे हे शनिवारी गावात फिरत असताना आरोपींनी त्यांना जंगलाच्या दिशेने नेत त्यांची हत्या केली. त्यानंतर करबटे यांच्या गळ्यातली सोन्याची चैन, हातातल्या अंगठ्या चोरुन नेल्या. हातातल्या अंगठ्या निघत नसल्याने त्या तरुणांनी कोयत्याने त्यांचे बोटे तोडून अंगठ्या काढल्या. तुटलेल्या बोटांवरून पोलिसांनी पुढील तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

नेमके प्रकरण काय?

शनिवारी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच सुरु होती. गावातले सर्व लोक मॅच पाहण्यात दंग होते. यावेळी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास बाळकृष्ण करबटे हे कचरा टाकण्यासाठी घरापासून काही अंतरावर असणाऱ्या ओढ्याजवळ गेले. ओढ्यापासून काही अंतरावर जगबुडी नदीकडे जाणारा रस्ता आहे. तेथे काहीतरी कारण सांगत तरुणांनी त्यांना जंगलमय भागात नेले आणि त्यांना मारहाण करीत अंगावरचे सोन्याचे दागिने चोरले. तसेच हातातली अंगठी निघत नाही म्हणून चक्क कोयत्याने त्यांची बोट तोडली आणि सोन्याची अंगठी चोरली. त्यानंतर त्यांचा मृतदेह जगबुडी नदीत फेकून दिला. दुसऱ्या दिवशी करबटे बेपत्ता झाल्याने गावातील लोकांनी शोध सुरू केली असता नदीकिनारी त्यांना तुटलेले बोट, एक बॅटरी आणि मांसाचा एक तुकडा आढळला. त्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ खेड पोलीस ठाण्यात याची माहिती दिली.

खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत काशीद, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक, चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आरोपींचा कसून तपास सुरू केला. श्वान पथक मागवण्यात आले. फॉरेन्सिक व्हॅनला पाचारण करण्यात आले. श्वान पथकाच्या मदतीने पोलिसांनी आरोपींचा माग काढत एकएक आरोपीच्या मुसक्या आवळल्या. नदीत फेकलेला मृतदेह खेडमधील रेस्क्यू टीमच्या सहकार्याने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

दामदुपटीचे अमिष दाखवून 5 लाख 64 हजार लाटले

औरंगाबादमध्ये दिलेल्या पैशांची दुप्पट किंमत मिळणार असे अमिष दाखवून औरंगाबादमधील 12 नागरिकांची फसवणूक झाल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले. शहरातील 12 नागरिकांनी दामदुपटीच्या अमिषांना बळी पडून अशा ठिकाणी पैसे पाठवले होते. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे (Aurangabad cyber police) धाव घेतली. मात्र तक्रार दाखल होताच, पोलिसांची तपास चक्रे फिरू लागली आणि संबंधित नागरिकांचे पैसे पुन्हा पाठवण्यात आले. (The mystery of the murder in Khed was solved; Murdered for gold jewelry)

इतर बातम्या

Mumbai Drugs Case : ड्रग्स प्रकरणात दोन आरोपींना विशेष न्यायालयाकडून दिलासा, जामीन मिळालेले दोन आरोपी कोण?

Pegasus Spying:स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर उद्या सर्वोच्च न्यायालय देणार आदेश

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.