CCTV Video : वसईत उच्चभ्रू इमारतीत चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून शोध सुरु

वसई पश्चिमेला अग्रवाल हे उचभ्रू वस्तीचे कॉम्प्लेक्स आहे. या परिसरात सर्व व्यावसायिक, अधिकारी लोक राहतात. या सोसायटीमधील कॉमन टॉयलेटमधील नळही महागडे असतात. नेमकी हीच संधी साधून दोन चोरट्यांनी सोमवारी 23 मे रोजी मोटारसायकलवर येऊन, सुरक्षा रक्षकाला संशय येऊ नये यासाठी इन्ट्री बुकमध्ये चुकीचा 8 अंकी मोबाईल नंबर टाकून इन्ट्री केली आणि सोसायटीमधील कॉमन टॉयलेट मधील नळ चोरून बॅगमध्ये भरून फरार झाले आहेत.

CCTV Video : वसईत उच्चभ्रू इमारतीत चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून शोध सुरु
वसईत उच्चभ्रू इमारतीत चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 5:46 PM

वसई : मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय झाल्यानंतर आयुक्तालय परिसरातील चोरी, घरफोडीच्या घटना कमी होतील अशी सर्वांची अपेक्षा होती. पण वसई, विरार, नालासोपारा परिसरात चोरी (Theft), घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच असताना पाहायला मिळत आहेत. वसईच्या अग्रवाल या उच्चभ्रू वस्ती (High Profile Society)त एकाच दिवसात आजूबाजूच्या 4 सोसायटीमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाल्याचे समोर आले आहे. दोन चोरटे खुळलेआम मोटारसायकल वर आले. सोसायटीच्या एन्ट्रीबुकमध्ये 8 अंकी चुकीचा मोबाईल नंबर टाकून इन्ट्री केली आणि चोरी करून फरार (Absconding) झाले आहेत. ही घटना 23 मे रोजी घडली असून हा सर्व प्रकार सोसायटीतील cctv कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हे cctv तपासल्यानंतर ही घटना उघड झाली आहे.

सोसायटीतील कॉमन टॉयलेटमधील नळ चोरले

वसई पश्चिमेला अग्रवाल हे उचभ्रू वस्तीचे कॉम्प्लेक्स आहे. या परिसरात सर्व व्यावसायिक, अधिकारी लोक राहतात. या सोसायटीमधील कॉमन टॉयलेटमधील नळही महागडे असतात. नेमकी हीच संधी साधून दोन चोरट्यांनी सोमवारी 23 मे रोजी मोटारसायकलवर येऊन, सुरक्षा रक्षकाला संशय येऊ नये यासाठी इन्ट्री बुकमध्ये चुकीचा 8 अंकी मोबाईल नंबर टाकून इन्ट्री केली आणि सोसायटीमधील कॉमन टॉयलेट मधील नळ चोरून बॅगमध्ये भरून फरार झाले आहेत.

अग्रवाल परीसरातील कैल हेरिटेज, इम्परेस टॉवर, किंग स्टोन टॉवर, जास्मिन बिल्डिंग, ओलिव बिल्डिंग या उच्चभ्रू सोसायटीतील कॉमन टॉयलेट मधील नळ आणि कॉक चोरी केले आहेत. याबाबत वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, cctv आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांवरून आयुक्तालयातील पोलिसांनी आता दिवस रात्र गस्त वाढवून या चोरीच्या घटना कमी कराव्यात आणि नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी ही नागरिक करत आहेत. (Theft in a high-rise building in Vasai, incident captured on CCTV, search for burglars begins)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.